सीजीएचएस योजनेचा लाखो सेवकांना लाभ : खा. गोडसे

सीजीएचएस योजनेचा लाखो सेवकांना लाभ : खा. गोडसे

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

केंद्रीय कर्मचार्‍यांना Central employees नाशिकमध्ये सीजीएचएस योजनेचा CGHS scheme लाभ देण्यासाठी गेल्या काही वर्षापासून सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून यामुळे लाखो कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना फायदा होणार आहे. शिवाय युनियनच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांबाबत आपण कामगार मंत्रालयाकडे पाठपुरावा करून त्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खा. हेमंत गोडसे MP Hemant Godse यांनी दिले.

एम एस एम्प्लॉईज युनियन मुंबई स्थित देवळाली नॉर्थ शाखेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात खा. गोडसे बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय कर्मचार्‍यांना सीजीएचएस या योजनेचे लाभ मिळण्यासाठी पूर्वी मुंबई व पुणे येथे जावे लागत होते. मात्र मंत्रालय स्तरावर केलेले प्रयत्न व अधिकारी वर्गाने केलेले सहकार्य यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे नाशिकची झालेली निवड येथील कर्मचारीवर्गास मोठा दिलासा देणारी असून लाखो कर्मचार्‍यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते खा. गोडसे यांचा सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवळाली रिजनचे माजी जनरल सेक्रेटरी जयंत डी. भारंबे यांनी या योजनेसाठी करावे लागलेले प्रयत्न व त्यास खा. गोडसे यांचे लाभलेले सहकार्य हे महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून जागृत लोकप्रतिनिधी कसा असावा याचे आदर्श उदाहरण असल्याचे सांगितले.

व्यासपीठावर गॅरिसन इंजिनीयर योगेंद्र सिंग, कॅप्टन हिमांशू मिश्रा, नवीन कुमार बरंनवाल, शंतनु कोल्हे सुभेदार मेजर पंढरे, एस.पी. वासूलकर उपस्थित होते. यावेळी युनियनचे सेक्रेटरी तुषार गोरे, व्हाईस चेअरमन संजय गोडसे, मंगेश कापसे यांनी स्वागत केले.

कार्यक्रमास समाधान शिंदे, दिलीप भिसे, नारायण सूजगुरे, अविनाश दुबे, के. के. गुरु आदी उपस्थित होते. यावेळी कामगार युनियनच्या वतीने खा. गोडसे याना निवेदन देण्यात आले. त्यात नॅशनल पेन्शन स्कीम बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, कामगारांचे मेडिक्लेम रेल्वे प्रमाणे कॅशलेस करावी, घरभाडे भत्ता, नवीन नेमणुका, खाजगीकरण याशिवाय सीजीएचएस या योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरताना त्यात नाशिक दिसत नाही ते तातडीने व्हावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com