नाशिकला होणार सीजीएचएस हॉस्पिटल

नाशिकला होणार सीजीएचएस हॉस्पिटल

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

येथे सी.जी.एच.एस. हॉस्पिटलला (C.G.H.S. Hospital) मंजुरी मिळाली असून ते लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harshavardhana) यांनी या हॉस्पिटलसाठी मंजुरी दिल्याबद्दल खा. डॉ. भारती पवार (MP Dr. Bharti Pawar) यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे...

नाशिकला होणार सीजीएचएस हॉस्पिटल
मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून सी.जी.एच.एस हॉस्पिटल सुरू व्हावे, म्हणून प्रयत्न सुरू होते. हे हॉस्पिटल जर सुरू झाले तर त्याचा लाभ जिल्ह्यातील अनेक केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यासाठी खा.डॉ.भारती पवारांनी लोकसभेत देखील प्रश्न उपस्थित केला होता.

तसेच केंद्रीय आरोग्य कमिटीच्या बैठकीत याबाबत मागणी केली होती. या मागणीला अखेर यश आले असून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी सी.जी.एच.एस. हॉस्पिटलला मंजुरी दिली आहे. खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेतली. या हॉस्पिटलसाठी जागा शोधण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी आरोग्य विभागाकडून कार्यवाही सुरु करण्यात आल्याची माहिती खा. डॉ. भारती पवार यांनी दिली.

भेटीप्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) करोना (Covid-19) परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच सर्व नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी व मोठ्या संख्येने लसीकरण (Vaccination) करण्याचे आवाहन त्यांनी केले..

काय आहे सी.जी.एच.एस. योजना

केंद्रीय सरकार स्वास्थ्य योजना (सीजीएचएस) ही केंद्र सरकारची योजना असून त्यात केंद्र सरकारचे कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. आयुष विभागांतर्गत येणाऱ्या अ‍ॅलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि भारतीय औषध प्रणालीद्वारे सीजीएचएसअंतर्गत आरोग्य सेवा पुरविल्या जातात.

योजनेच्या सुरळीत कामकाजासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना दवाखान्यांचा प्रभारी म्हणून नियुक्त केले जाते.

योजनेंतर्गत प्रत्येक केंद्रीय कर्मचार्‍यास सीजीएचएस कार्ड मिळते, ज्याद्वारे त्याला सरकारी रुग्णालयात मोफत उपचार मिळते. तसेच, सीजीएचएसच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयांमधील उपचारासाठी त्या रुग्णालयाच्या फीमध्ये सूट मिळते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com