‘सीईटीपी’ प्रकल्पास मिळणार गती

‘सीईटीपी’ प्रकल्पास मिळणार गती

सातपूर । प्रतिनिधी Satpur

प्लेटिंग उद्योगांसाठी उभारल्या जाणार्‍या कॉमन इफ्यूयंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) उभारणी कामाला गती मिळू लागली आहे .

एमआयडीसीच्या वतीने याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्लेटिंग व पावडर कोटिंग उद्योगांच्या माध्यमातून बाहेर पडणार्‍या घातक रसायन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी उभारण्याचा निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र यासोबतच झिरो लिक्विड डिस्चार्ज (झेडएलडी) प्रकल्पही उभारण्यासाठी प्रशासनाने आडकाठी केली.

यामुळे 12 कोटीचा प्रकल्प 20 कोटींवर पोहोचला. या प्रकल्पासाठी लागणार्‍या भांडवलाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ एमआयडीसी व प्लेटिंग उद्योगांची एसपीव्ही यांच्या माध्यमातून उभारणी केली जाणार होती. टक्केवारीनुसार प्रकल्पाच्या 25 टक्के रक्कम प्लेटिंग फाउंडेशनने घ्यावयाची होती.

5 टक्के रक्कम प्रदूषण नियंत्रण मंडळाने व उर्वरित 70 टक्के रक्कम एमआयडीसीने द्यावी, अशी भूमिका घेण्यात आली होती. याबाबत 22 जून रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मेंबर सेक्रेटरी, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी व प्लेटिंग उद्योगांच्या फाऊंडेशनचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. त्यानुसार या प्रकल्पाचे पूर्णत्वासाठी एमआयडीसी लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर एमआयडीसीच्या नाशिक कार्यालयाद्वारे सुधारित प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. सदर प्रस्ताव हा लेखा व वित्त विभागाकडे विचाराधीन असून, येत्या तीन ते चार दिवसात यावर निर्णय होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी यांच्याकडे सादर केला जाणार आहे.

त्यामुळे येत्या आठ दिवसात या विषयाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून, प्रलंबित असलेले सीईटीपीचे बांधकाम गतीने सुरू होण्यास मदत होईल असा विश्वास उद्योजक व्यक्त करीत आहेत.

प्लेटिंग उद्योगांनी या प्रकल्पासाठी फाउंडेशन उभारलेले असून उद्धव यांच्या वतीने भराव्या लागणार्‍या भांडवलासाठी निधीही ही बँकेत जमा केलेला आहे न्यायालयाच्या निर्देशानंतर प्लेटिंग उद्योगांचे परवाने नूतनीकरण थांबलेली आहे. त्यामुळे प्लेटिंग यांच्यावतीने या प्रक्रियेत कुठेही दिरंगाई केलेली नसताना उद्योगांवर संकट घोंगावत आहे. शासनाने तातडीने यावर निर्णय घेऊन प्रक्रिया गतीने राबवावी.

समीर पटवा, समन्वयक-प्लेटिंग फाउंडेशन

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com