
नाशिक । प्रतिनिधी Nashik
अकरावी प्रवेशासाठी ( Eleventh Std Admissions ) घेण्यात येणार्या सामाईक प्रवेश परीक्षेतील (सीईटी) ( CET ) अडचणींसाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने विभागवार संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडीघोषित करण्यात आले आहेत. येत्या 21 ऑगस्टला ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 'HTTP:// CET.MH-SSC.-C.IN या संकेतस्थळावर परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत.
मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ही परीक्षा होणार आहे. राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर सीईटी परीक्षा आधारित असून, त्यासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असेल.
परीक्षेसाठी शंभर गुणांची एकच प्रश्नपत्रिका असून, त्यासाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येईल. विद्यार्थ्यांना 26 जुलैपर्यंत परीक्षेसाठी अर्ज भरता येईल.परंतु अकरावी सीईटी नोंदणीसाठी राज्य मंडळाने सुरू केलेली वेबसाइट सूरु झाल्यापासूनच तांत्रिक समस्यांमध्ये अडकल्याने, ती तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आली आहे.