लस घेतली नसतानाही महिलेला मिळाले प्रमाणपत्र !

लसीकरणाचा सावळा गोंधळ, आरोग्य विभागाचा अजब कारभार
लस घेतली नसतानाही महिलेला मिळाले प्रमाणपत्र !

पुनदखोरे । Punadkhore

करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या आदेशान्वये संपुर्ण देशात व राज्यात लाभार्थ्यांना कोविशिल्ड, कोव्हक्सीन आदी लसींसह लसीकरण (Corona Vaccination) करण्यात येत आहेत. शासनाचा एकच उद्देश असुन, प्रत्येक लाभार्थ्याला लसींचा लाभ मिळावा या हेतूने रोज हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांचे लसीकरण होत आहेत.

पंरतू कळवण तालुक्यातील (Kalwan taluka) नवी बेज प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Navi Bej Primary Health center) एका ६४ वर्षीय महीलेला लसीचा दुसरा डोस (Second Dose) न देताच लस घेतल्याचे प्रमाणपत्र ( vaccination certificate) प्राप्त झाल्याने आरोग्य विभागाचा (helath Department) सावळा गोंधळ उघडकीस आला आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की कळवण येथील रहिवासी भिमाबाई विष्णू गोसावी(Bhimabai Vishnu Gosavi) (वय ६४) या महीलेने ८४ दिवसांपुर्वी कोविशिल्डचा पहीला डोस (Covishiled First Dose) घेतला होता. दुसऱ्या डोस साठी सदर महीलेने ऑनलाईन रजिस्ट्रेशन (Online Registration) केल्यानंतर (दि.०३) जुलै रोजी लाभार्थी महीलेची नवी बेज प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद झाली. दि. ०३ जुलै रोजी संबधीत महीला नवीबेज प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेली असता, तेथील आरोग्य सेवकांनी लस शिल्लक (Vaccine Not Available) नसल्याचे सांगीतल्याने सदर महीला माघारी गेली.

त्यानंतर महीलेच्या मोबाईलवर दुसरा डोस घेतल्याचा मॅसेज (Get SMS) आल्याने तसेच लस घेतल्याचे प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त झाल्याने लाभार्थी महीला गोंधळून गेली. प्रमाणपत्रावर ३ जुलैला १ वाजुन १ मिनिटांनी लस घेतल्याचा मॅसेज आला असुन, त्याचा बॅच नं. सह रिफ्रेन्स आय.डी., सिक्रेट कोड मिळाल्याचे निर्दशनास आले आहे. त्याचप्रमाणे सदर लस आरोग्य सेवक अनिल सुरेश शिवदे यांनी दिली असल्याचा प्रमाणपत्रावर उल्लेख आहे.

मी दोन दिवसांपुर्वी आईच्या नावाची ऑनलाईन नोंद केली होती. त्यात नवी बेज प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजच्या तारखेस लस मिळणार होती. पंरतू माझ्या आईला कोविसिल्ड लसीचा दुसरा डोस न देताच प्रमाणपत्र मिळाल्याने आम्हालाच कोडे पडले आहे. वरीष्ठांनी सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी.

- दिपक गोसावी, महीलेचा मुलगा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com