तृणधान्याविषयी जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन

तृणधान्याविषयी जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक | प्रतिनिधी

पौष्टिक तृणधान्याविषयी जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी शिक्षण विभागावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. येत्या १ ऑगस्टपासून विविध उपक्रम सुरु होणार आहे. याबाबतचे पत्र शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिक्षक यांना वितरीत करण्यात आले आहे.

भरड धान्याविषयी जागृती करण्यासाठी आता शिक्षण विभाग देखिल पुढे येत आहे. पौष्टिक तृणधान्याविषयी जागृती केली तरच त्याचा वापर वाढेल व त्यानंतरच उत्पादनाला मागणी येईल. परंतु त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या जनजागृती उपक्रमांकरिता कृषी विभागासह शिक्षण विभागांच्या यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. त्याचा फायदा उपक्रम वाढण्यास होणार आहे.

पौष्टिक तृणधान्य जागृतीसाठी तालुका तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना विविध उपक्रम राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

१ ते १४ ऑगस्टदरम्यान जिल्हाभरातील शाळांमध्ये तृणधान्यांबद्दल कृषी सहायकांमार्फत माहीती देण्यात येणार आहे. त्यात शाळांमध्ये पालक, नागरिक यांचा देखील समावेश असणार आहे. जिल्हाभरात विविध ठिकाणी उपक्रम राबविले जाणार असून, त्याबाबत जिल्हा परिषदेकडून लवकरच माहिती दिली जाणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com