केंद्राच्या धोरणामुळेच राज्यातील डाळ झाली खराब

भुजबळांचा केंद्रावर आरोप : लवकरच वितरित करणार
केंद्राच्या धोरणामुळेच राज्यातील डाळ झाली खराब

नाशिक । Nashik

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि आत्मनिर्भर भारत या योजनांतर्गत राज्याला दिलेली अन् वाटप करुन शिल्लक राहिलेली ६ हजार ४४२ मेट्रीक टन डाळ केंद्र सरकारनेच वाटपास परवानगी दिली नसल्याने खराब झाल्याचा आरोप अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

१५ एप्रिलला केंद्राने आता डाळ राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत करण्यास परवानगी दिलि असून ती लाभार्थ्यांना केली जाईल असे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने कोरोना संसर्गाच्या काळात बेरोजगार झालेल्या, हातावर पोट असलेल्या मजूर, गोरगरीब रेशनकार्ड धारक लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्य आणि प्रतिकार्डसाठी १ किलो चणा किंवा तूर डाळीचे वाटप केले.

या काळात केंद्र शासनाने तीन योजनेंतर्गत या अन्न धान्य व डाळीचे वितरण केले. राज्याला एप्रिल ते नोव्हेंबर या काळात १लाख १३ हजार ४२ मेट्रीक टन डाळ दिली होती.

त्यापैकी १ लाख ६ हजार ६०० मेट्रीक टन डाळींचे ८ महिन्यांत वितरण झाले. ६ हजार ४४२ मेट्रीक टन डाळ शिल्लक राहीली होती. अन् नोव्हेंबरनंतर मात्र या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना १ व २ आणि आत्मनिर्भर भारत या योजना केंद्राने बंद केल्या.

पण तीन्ही योजनेंतर्गत वाटप करुन शिल्लक असलेल्या डाळींबाबत कुठलेही धोरण स्पष्ट केले नाही. राज्य शासनाने वारंवार पाठपुरावा केला. परंतू तरीही वितरणाबाबत गत ५ महिन्यांत केंद्राकडून मार्गदर्शन मिळाले नव्हते.

आता त्याची पोलखोल झाल्यानंतर ही डाळ खराब होत असल्याचे उघड झाल्यानंतर अखेर केंद्र शासनाने ही डाळ राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यास १५ एप्रिल रोजी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सुस्थितीत असलेली डाळ त्वरीत वितरीत केली जाणार आहे. तसे आदेेशही अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com