मध्य रेल्वेची २३.२२५ दशलक्ष टन मालवाहतूक

लॉकडाऊन काळातही दिली सेवा
मध्य रेल्वेची २३.२२५ दशलक्ष टन मालवाहतूक

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मालाची वाहतूक वेळेवर करण्यासाठी, रेल्वेने कोविड-19 कारणाने लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत.

यासंदर्भात मध्य रेल्वेने दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, दि.23 मार्च ते 9 सप्टेंबर या काळात मध्य रेल्वेने 23.225 दशलक्ष टन मालवाहतुकीची यशस्वी पूर्तता केली. मध्य रेल्वेने या काळापर्यंत 9,279 मालगाड्या चालविल्या. त्यातून 4,42,944 वॅगन्स भरून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व पोलाद, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची मालवाहतूक करण्यात आली आहे.

या कालावधीत दररोज सरासरी 2,590 वॅगन्सची मालवाहतूक केली गेली. मध्य रेल्वेने अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या 1,67,023 वॅगन्स विविध वीज प्रकल्पांपर्यंत नेल्या.

तसेच अन्नधान्य आणि साखर 5,155 वॅगन्स; शेतकर्‍यांच्या हितासाठी 20,543 खतांची वॅगन्स व 6,555 कांद्याचे वॅगन्स; पेट्रोलियम पदार्थांचे 43,824 वॅगन्स; लोह आणि स्टीलच्या 11,747 वॅगन्स; सिमेंटची 28,299 वॅगन्स; 1,37,760 कंटेनर वॅगन्स आणि सुमारे 22,038 डी-ऑईल केक आणि संकीर्ण वस्तूंचे वॅगन्स वाहून नेले.

मध्य रेल्वेवर क्षेत्रीय स्तरावर आणि विभागीय स्तरावर बहु-अनुशासित व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) ची स्थापना रेल्वेने केली आहे. वरीष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असलेला हा घटक रेल्वेमार्फत अधिक वाहतूक संधी निर्माण करण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधतो, असेही पत्रकात नमूद केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com