कोविड रुग्णालयात सेंट्रल किचन योजना राबविणार
नाशिक

कोविड रुग्णालयात सेंट्रल किचन योजना राबविणार

करोना रुग्णांंच्या तक्रारीची आयुक्तांकडुन दखल

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना बाधीतांना उपचाराच्या दरम्यान प्रतिकार शक्ती निर्माण करणारे ठराविक जीवनसत्व युक्त पोटभर अन्न दिले जावेत असे निर्देश असतांना महापालिका क्षेत्रात वाढत्या रुग्णसंख्येमुळे पोटभर अन्न दिले जात असल्याच्या तक्रारीची दखल महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आहे. आता शहरातील करोना बाधीत रुग्णांना सेंट्रल किचन पद्दतीने अन्न शिजवून ताजे - गरम व पोटभर अन्न दिले जाणार असुन आठवडाभरात हे काम सुरू होणार आहे. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नाशिक महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील रुग्णांना पोटभर जेवण देण्याचा निर्णय आयुक्त गमे यांनी नुकताच घेतला आहे. शहरातील करोना रुग्णांना जेवणाची पाकीटे पुरविणार्‍या काही एनजीओ व संस्थाना आता रुग्ण वाढल्यामुळे मर्यादा आल्याने आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. हे जेवण सेट्रल किचन पद्दतीने रुग्णालयात एका बाजुला तयार करुन दिले जाणार आहे. याकरिता सर्वाधिक रुग्ण असलेले समाज कल्याण वसतीगृह, मेरी येथील पंजाबराव देशमुख मराठा वसतीगृह व नवीन बिटको रुग्णालय अशा कोविड रुग्णालयात ही सेट्रल किचन योजना राबविण्यात येणार आहे.

पोटभर जेवणाबरोबर चहा, गरम पाणी रुग्णांना दिले जाणार आहे. नाशिक शहरात गेल्या ६ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून टप्प्या टप्प्याने रुग्ण वाढत जाऊन ३१ मेपर्यत २१४ रुग्ण आढळले होते. नंतर जुन महिन्यात रुग्ण संख्या वाढत जाऊन १९५८ पर्यत गेली. नंतर जुलै १४ हा पर्यत रुग्णांचा आकडा ४४३७ झाला आहे. असे असले तरी आत्तापर्यत २७९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असुन सध्या १४५९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. गेल्या जुन व १४ जुलैपर्यत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. करोना रुग्ण एप्रिल ते मे या महिन्यात कमी असल्याने या रुग्णांना जेवण पुरविण्यासाठी काही एनजीओ व संस्था पुढे आल्या होत्या.

या सामाजिक सस्ंथांकडुन आत्तापर्यत करोना बाधीत रुग्णांना जेवणाची पाकीटे देण्याचे काम सुरू होते. मात्र १ ते १४ जुलै दरम्यान २ हजार 327 रुग्ण वाढले आहे. अशाप्रकारे शहरात करोना संसर्ग वाढत जाऊन रुग्णांची संख्या पाच हजाराच्या आसपास जाऊन पोहचली आहे. आत्तापर्यत या रुग्णांना जेवणाची पाकीटे पुरविण्याचे काम काही एनजीओ व संस्था करीत होत्या. अजुनही काही संस्था जेवणाचे पाकीट तयार करीत असुन त्यांना देखील रुग्ण संख्या वाढल्याने मर्यादा आल्या आहे.

या जेवणाच्या पाकीटात २ ते ३ पोळ्या, भाजी व भात अशा स्वरुपाचे लिमीटेड जेवण असल्याचे घरी जास्त जेवणाची सवय असलेल्या रुग्णांना पोटभर जेवण मिळत नव्हते, अशा तक्रारी होत्या. याच तक्रारीवरुन महापालिका आयुक्त गमे यांनी तीन दिवसापुर्वी कोविड रुग्णालयात थेट रुग्णांची भेट घेऊन विचारपुस केली होती. यावेळी रुग्णांच्या जेवणासंदर्भात विचारणा केल्यानंतर पोटभर जेवण मिळत नसल्याची बाब समोर आली होती. याची दखल घेत आयुक्तांनी आता महापालिकेच्या खर्चातून रुग्णांना सेंट्रल किचन पध्दतीने रुग्णालयाच्या ठिकाणी तयार केलेले गरम जेवण, गरम व कोमट पाणी, चहा देण्यांचा निर्णय घेतला आहे. आता येत्या आठवड्यात रुग्णांना महापालिकेच्यावतीने जेवण दिले जाणार आहे.

मनपा क्षेत्रातील रुग्ण स्थिती

डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय १२६

बिटको कोविड सेंटर ना. रोड १७५

समाज कल्याण वसतीगृह १४३

पंजाबराव देशमुख वसतीगृह ८४

Deshdoot
www.deshdoot.com