सेंट्रल किचन ठेका प्रक्रियेला गती मिळेना!

सेंट्रल किचन ठेका प्रक्रियेला गती मिळेना!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महानगरपालिकेच्या ( NMC ) माध्यमातून शालेय विद्यार्थ्याना सकस पोषण आहार (Nutritional diet)देण्याकरिता सेन्ट्रल किचनचा ठेका( Central Kitchen Contract ) देण्यासाठी निवीदा प्रक्रिया सुरू झाली आहे.मात्र सेन्ट्रल किचन ठेक्याची प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्याची आवश्यकता असतानाही सध्या ही प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरु आहे.याला महापालिकेतीलच एक वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचे समजते.

नाशिक महापालिकेने पूर्वीच्या संस्थांचा ठेका निकृष्ट पोषण आहारावरुन अपात्र ठरवला होता. याप्रकरणी ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने 21जूनपर्यत पोषण आहार पुरवठयाचे काम देण्याबरोबर नवीन निविदा प्रक्रियेत इतरांबरोबच या ठेकेदारांना सहभागी करुन घ्यावे, असे न्यायालयाने आदेश दिले होते. यानुसार आगामी तीन वर्षासाठी पालिकेने माध्यान्ह भोजन ठेक्याची निविदा मे महिन्यात पुन्हा काढली.

यासाठी एकूण 47 संस्थांनी निविदा भरल्यात. राज्य व केद्रांनी घालून दिलेल्या अटी शर्थीचे पालन करणार्‍यांनाच या निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येणार होते. शहरातील 1 लाख 6 हजार विद्यार्थ्याना माध्यान्ह भोजनाच्या माध्यमातून सकस आहार देण्यात येणार आहे. 10 हजार विद्यार्थ्यांसाठी 2 गट, 40 हजार विद्यार्थी संख्येसाठी 10 गट, तर 2 हजार विद्यार्थी संख्येसाठी 25 गट असे एकूण 37 संस्थांना माध्यान्ह भोजन म्हणजेच सेन्ट्रल किचनचा ठेका देण्यात येणार आहे.

मध्यान्ह भोजनाची प्रक्रिया जलद होईल, असे चित्र मध्यंतरी होते. परंतु माशी शिंकली कुठे, असा सवाल केला जातोय. माध्यान्ह भोजनाला गती देण्याऐवजी हेतूपुरस्कर या ठेक्याला विलंब कसा होईल, यासाठीच पालिकेतील एक बडा अधिकारी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे दोन हजार विद्यार्थ्यासांठी तब्बल 25 गटांना काम दिले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com