केंद्राचे फिरते उर्दू ग्रंथालय आज नाशकात

केंद्राचे फिरते उर्दू ग्रंथालय आज नाशकात

जुने नाशिक | प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या (Central Government) शिक्षण मंत्रालयातर्फे (Ministry of Education) चालविण्यात येणाऱ्या नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज अर्थात एनसीपीयुएलकडून (NCPUL) देशभर फिरणारे फिरते ग्रंथालयाचे वाहन उद्या (दि.७) शहरातील सारडा सर्कल (Sarda Circle) येथील नॅशनल उर्दू कॅम्पसमध्ये पोहोचणार आहे...

हे फिरते ग्रंथालय (library) सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेच्या आवारात उपलब्ध राहणार आहे. यावेळी उर्दू प्रेमींनी ग्रंथालयाला भेट देऊन पुस्तके खरेदी करावीत, असे आवाहन वाहन प्रमुख मोहम्मद ताहीर सिद्दीकी यांनी केले आहे.

कौन्सिलचे संचालक डॉ. अकील अहमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाहन देशभर भ्रमण करून उर्दू प्रेमींना त्यांची पसंतीची पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत आहे. तेलंगाना येथून निघालेली ही वाहने कर्नाटक मार्गे महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, भिवंडी येथे जाऊन आज नाशकात (Nashik) येणार आहेत.

यानंतर उद्या व परवा मालेगावात मुक्काम करणार आहे. त्यानंतर धुळे, शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा या ठिकाणी हे वाहन पोहचणार आहे. या वाहनांमध्ये उर्दू साहित्य, इतिहास, वनौषधी शास्त्र, डिक्शनरी, विज्ञान आदी विषयांवरील शेकडो पुस्तके पाहायला व खरेदी करायला मिळणार आहेत.

तसेच खरेदीवर २५ ते ७५ टक्के पर्यंत सूट दिली जाणार आहे. या संधीचा उर्दू प्रेमींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नॅशनल कॅम्पसचे सचिव प्रा. जाहिद शेख व उर्दू डिप्लोमाचे केंद्र प्रमुख लियाकत पठाण यांनी केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com