केंद्र सरकारकडून भरमसाठ इंधनदरवाढ - महसुलमंत्री बाळासाहेब थोरात

काँग्रेसची रॅली; गोंदे, वाडीवर्‍हे येथे सभा
केंद्र सरकारकडून भरमसाठ इंधनदरवाढ - महसुलमंत्री बाळासाहेब थोरात

घोटी| वार्ताहर Ghoti

काँग्रेसच्या congress सत्ताकाळात पेट्रोलमध्ये Petrol पन्नास पैसे वाढले तर आंदोलन करणार्‍या भाजप BJP आता पन्नास रूपयांनी पेट्रोल वाढल्यानंतर कुठे तोंड लपवून बसल आहे.भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून वाढ झाली आहे. गरीबांचे कंबरडे मोडले आहे, असे प्रतिपादन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात Revenue Minister Balasaheb Thorat यांनी केले. वाढती महागाई inflation व इंधन दरवाढीच्या विरोधात आज जनजागरण अभियानानिमित्त काँग्रेसकडून गोंदे, वाडीवर्‍हे येथे जनजागृती सभा घेतली. त्यावेळी थोरात बोलत होते.

तब्बल एक वर्षापासून शेतकर्‍यांनी दिल्लीत आंदोलन केले हे आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रकारे त्रास देण्याचे काम केले. शेतकरी हटले नाही म्हणुन शेतकर्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम भाजपाने केले. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आज माघार घेत तीन कायदे मागे घेण्याची घोषणा केली, हा शेतकर्‍यांचा कष्टक-यांचा, गरीब जनतेचा विजय आहे. पुढे बोलतांना थोरात म्हणाले की, आंतरराष्टीय स्तरावर इंधनाच्या दरांत मोठी कपात होऊनही भारतात मात्र पेट्रोलच्या दराने 110 रुपये गाठली असून डिझेलनेही शंभरी पार केली आहे, याकडे लक्ष वेधत श्री. थोरात यांनी खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळेही गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे सांगितले.

यावेळी आमदार खोसकर बोलतांना -शेतकर्‍यांच्या शेताची अवकाळी पावसामुळे मोठी हानी झाली, त्यांचे पंचनामे करण्यात यावेत, व पिकविमा कंपनीकडून शेतकर्‍यांना भरपाई मिळवून द्यावी तसेच विज वितरणाला विज कट न करण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी केली.

यावेळी व्यासपिठावर महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजीमंत्री शोभा बच्छाव, माजी प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, माजी सभापती गोपाळ लहांगे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, नगरसेवक राहुल दिवे, माजी सभापती संपत काळे, लकी जाधव महिला अध्यक्ष मनिषा मालुंजकर, ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी गोंदे गावातुन मुंबई आग्रा महामार्गापर्यंत रॅली काढुन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला. या प्रसंगी रमेश जाधव, राजाराम धोंगडे, कचरू पा. शिंदे, पांडुरंग शिंदे, सरपंच शरद सोनवणे, उपसरपंच परशुराम नाठे, माजी सरपंच कमलाकर नाठे, रघुनाथ खातळे, कारभारी नाठे, उत्तम भोसले, संतोष सोनवणे, गणेश कवठे यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, तालुका काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com