केंद्र सरकारमुळे ओबीसी आरक्षणाला खो - पालकमंत्री भुजबळ

कानळद येथे विकासकामांचे उद्घाटन
केंद्र सरकारमुळे ओबीसी आरक्षणाला खो - पालकमंत्री भुजबळ

शिरवाडे वाकद । वार्ताहर Shirvade Vakad

फडणवीस सरकारच्या काळात जिल्ह्याचा विकास खुंटला होता. केवळ भुजबळांना श्रेय नको म्हणून जिल्ह्याचा निधी दुसरीकडे वळविला होता. आता मागील पाच वर्षात राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. तसेच मी कधीही जातीपातीचे राजकारण न करता विकासकामांना महत्व ( Importance of development work without politics ) दिले आहे. सध्या ओबीसींना आरक्षण (OBC Reservation )मिळत नाही याला केंद्रातील भाजप सरकार ( BJP Government ) जबाबदार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Bhujbal ) यांनी केले आहे.

निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील विविध विकासकामांचे भुमिपूजन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ना.भुजबळ बोलत होते. याप्रसंगी मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य हरिश्चंद्र भवर, पं.स. सदस्य शिवाजी सुरासे, पं.स. सदस्या गयाबाई सुपनर, संदिप दरेकर, माजी पं.स. सदस्य भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, शिवाजी सुपनर, शांताराम जाधव, डॉ.श्रीकांत आवारे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, गाव, वाडी प्रमुख महामार्गांना जोडणार्‍या रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याबरोबरच विज, पाणी व आरोग्याचे प्रश्न सोडविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे असेही भुजबळ म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. भुजबळ यांचे हस्ते रा.मा. 27 ते नांदूरमध्यमेश्वर, सारोळेथडी, खेडलेझुंगे, कानळद, शिरवाडे वाकद, प्र.जि.मा. 18.500 कि.मी. रस्ता कामाची सुधारणा करण्याचा शुभारंभ करण्यात आला.

तसेच कानळद येथे मुलभूत सुविधा अंतर्गत मारुती मंदिर परिसर काँक्रीटीकरण, कानळद येथे आमदार निधीतून सभामंडप, जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीचे नूतनीकरण, ग्रामस्वराज योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, देवी मंदिर सभामंडप, ग्रामनिधी योजनेअंतर्गत व्यापारी गाळे, ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत दलित वस्ती पाईपलाईन आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी देवगावचे उपसरपंच लहानू मेमाणे, कानळद उपसरपंच रुख्मिनी पगारे, सर्जेराव पारखे, विनोद जाधव, सिकंदर मोरे, अरूणा जाधव, ताराबाई पारखे, सुलोचना सापनर, सुरेश पारखे, विष्णु पगारे, कैलास जाधव, सोमनाथ पारखे, नाना पगारे, दादासाहेब पारखे, विजय जाधव, शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव, रोहिदास जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com