दमणगंगा प्रकल्पला केंद्र सरकारची मान्यता

दमणगंगा प्रकल्पला केंद्र सरकारची मान्यता

हरसूल । वार्ताहर | Harsul

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) व पेठ तालुक्यातून (peth taluka) वाहणारी दमनगंगा नदीचे (Damanganga river) पाणी त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यात बरोबरच नाशिक जिल्हात (nashik district) वळवावे अशी प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे (Bahujan Aghadi taluka president Umesh Sonawane) यांच्या नेतृत्व खाली गेल्या एक महिन्यापासून मागणी करुन पाठपुरावा करण्यात येत होता.

केंद्र सरकारने (central government) अर्थसंकल्पात (Budget) दमणगंगा पिंजाळ प्रकल्पला मान्यता दिली असून यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्र्यंबकेश्वरला पेढे वाटून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन करून आनंद व्यक्त करण्यात आला. त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यामध्ये सरासरी तीन हजार मिलिमीटर पर्यंत पाऊस पडतो परंतु या पावसाचा त्र्यंबकेश्वर तालुका (Trimbakeshwar taluka) पेठ तालुक्याला कुठल्या प्रकारे लाभ होत नाही.

अर्ध्या महाराष्ट्राला (maharashtra) आणि मुंबई (mumbai) ला पाणी पुरवणारे हे तालुके उन्हाळ्यामध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होत असते हे सर्व प्रश्न लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांनी 1 महिन्यापूर्वी दमणगंगा नदीची पाहणी करुन जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जलसंपदा विभाग व संबंधितांना यासंदर्भात निवेदन (memorandum) देऊन तात्काळ हा प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणी केली होती.

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये दमणगंगा-पिंजाळ या प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याचे जाहीर केले आहे.याबाबतचे वृत्त समजताच त्र्यंबकेश्वर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या आनंद व्यक्त करण्यात आला .यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, शहराध्यक्ष मोहन सोनवणे, राम जाधव, अंकुश सोनवणे, अमोल गांगुर्डे, अनिल गांगुर्डे, योगेश रोकडे, नारायण सोनवणे, माणिक पालवे, रविंद्र दोंदे, भुषण सोनवणे आदींसह मोठया संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com