रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष

नाशिक महानगर पालिका मुख्यालयात मध्यवर्ती नियंत्रण कक्ष
रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील करोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडुन कोविड रुग्णांना तत्काळ व योग्य उपचार केले जावेत म्हणुन सज्जता ठेवण्यात आली आहे. यानंतर आता शहरातील मनपा व खासगी रुग्णालयातील स्थिती व रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यादृष्टीने राजीव गांधी भवन महापालिका मुख्यालयात मध्यवर्ती नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात येणार आहे.

नाशिक शहरातील महापालिका रुग्णालय, खासगी रुग्णालय यात कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी खाटाची व्यवस्था केली जात असुन आजपर्यत जवळपासुन दीड हजाराच्यावर खाटा रिक्त आहे. तसेच अजुनही अलगिकरण व कोविड रुग्णांसाठी खाटांची तयारी केली जात आहे. वाढते रुग्ण लक्षात घेऊन नाशिककरांना रुग्णांसाठी खाटांची स्थिती व शहरातील रुग्णांची आकडेवारी, मृत्यू प्रमाण व उपचार होऊन घरी गेलेले रुग्ण यासंदर्भातील माहिती महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या संकेतस्थळावर डॅशबोर्डद्वारे दररोज उपलब्ध करुन दिली आहे.

आता महापालिका प्रशासनाकडुन महापालिका रुग्णालय, खासगी रुग्णालयातील कोविड व नॉन कोविड खाटांची स्थिती, याठिकाणी आरोग्य सुविधा पुरविणारे डॉक्टर - सेवक, रुग्णांच्या नातेवाईकांना काही मदत देणे अशा प्रकारे करोना संदर्भातील माहिती प्रशासकिय अधिकारी, रुग्ण नातेवाईक व नाशिककरांना महापालिका मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या कक्षात आपत्ती निवारण कक्षाप्रमाणेच हेल्पलाईन उपलब्ध करुन चार शिफ्टमध्ये चार सेवक दिवसभर कार्यरत राहणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com