कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्राने पुढाकार घेण्याची: जगताप

बांगलादेशने कांदा आयात थांबविल्याने बाजारभावावर परिणाम
कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्राने पुढाकार घेण्याची: जगताप

लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon

आशिया खंडातील (Asia continent) कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Market Committee) कांद्याची मोठी आवक होत असून सद्यस्थितीत बांगलादेशाने (Bangladesh) कांदा आयातीवर (Onion imports) बंदी घातल्याने त्याचा थेट परिणाम येथील कांदा बाजारभावावर झाला आहे.

त्यामुळे बांगलादेश बरोबरच इतरही देशात भारतीय कांदा (onion) मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावा यासाठी लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप (Lasalgaon Market Committee Chairperson Suvarna Jagtap) यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांच्या माध्यमातून वाणिज्य मंत्री, कृषी मंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री यांचेकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यास कांदा बाजारभावात सुधारणा होईल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.

लासलगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी येत असल्याने कांदा लिलाव प्रक्रिया (Onion auction process) लवकर आटोपून शेतकरी (farmers) वेळेत त्याचे घरी पोहचला पाहिजे यासाठी लासलगाव बाजार समितीच्या (Lasalgaon Market Committee वतीने एका वेळेस दोन ठिकाणी कांदा लिलाव सुरू करण्याचा विचारात आहे. सन 2021-22 मध्ये लासलगाव बाजार समितीत 85 लाख 34 हजार 261 क्विंटल कांदा आवक होऊन 1305 कोटी रुपयांची ऐतिहासिक उलाढाल झाली आहे. लासलगाव बाजार समितीत कांदा आवक वाढत असल्याने व कांदा लिलावात देखील स्पर्धा निर्माण केल्याने शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत आहे.

गेल्या 75 वर्षांपासून अमावस्येला कांदा लिलाव (Onion Auction) बंद ठेवण्याची परंपरा होती. मात्र याबाबत बाजार समितीने व्यापारी, हमाल, माथाडी यांचेशी समन्वय साधत अमावस्येला कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यातच बांग्लादेशच्या आयात बंदीमुळे भारतीय कांदा कोंडीत सापडला असून भारतीय कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसताच बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती सुवर्णा जगताप यांनी तत्काळ आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या माध्यमातून वाणिज्य मंत्री, कृषी मंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्याशी पत्रव्यव्हार करून बांगलादेश आणि इतर देशात आपल्या कांद्याला बाजारपेठ कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.

सध्या रेल्वेद्वारे कांदा पाठविण्यासाठी रॅक उपलब्ध करून दिल्या जातात. सदर रॅकद्वारे कांदा वाहतुकीसाठी साधारणत पाच ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. त्याऐवजी येथील कांदा निर्यातदारांना किसान रेल अथवा त्या धर्तीवर व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र रेल उपलब्ध करून दिल्यास सदरचा माल 48 ते 60 तासांमध्ये पोहोचविला जाईल. वेळ आणि भाडेदरातील बचतीमुळे व्यापारी वर्ग अधिकचा मोबदला शेतकरी बांधवांना भाववाढीसाठी देवू शकतील.

तसेच देशांतर्गत किंवा परदेशात कांदा पाठविणार्‍या खरेदीदारांना सबसिडी दिल्यास माल वाहतूक दरात अनुदान मिळत असल्याने कांदा खरेदीदार जास्तीत जास्त कांदा देशांतर्गत व परदेशात पाठविणेसाठी प्रयत्न करतील. त्यामुळे याचा विचार होणे गरजेचे आहे. सर्वात जास्त आवक व सरासरी मध्ये सर्वाधिक भाव मिळवून देणारी बाजार समिती अशी गणना लासलगाव बाजार समितीची शेतकर्‍यांमध्ये आहे. चवीला उत्कृष्ट असलेला जीआय मानांकन मिळालेला लासलगाव कृऊबातील कांदा जगातील 74 देशात निर्यात केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com