ऑक्सिजनसह रेमडिसिव्हर तुटवडयाला केंद्र जबाबदार

पालकमंत्री भुजबळांचा आरोप : ५६ मे.टनच पुरवठा
ऑक्सिजनसह रेमडिसिव्हर तुटवडयाला केंद्र जबाबदार

नाशिक । Nashik

नाशिक जिल्ह्यासाठी १२० मेट्रिक टन आॅक्सिजनची गरज असताना जिल्ह्यासाठी ८५ मेट्रिक टन आॅक्सिजन कोटा ठरवून देण्यात आला आहे. प्रत्यक्षात दिवसाला ५२ टन तर कधी ८३ मेट्रिक टन आॅक्सिजन पुरवठा होतो.

Title Name
नाशिकनंतर दुसरी मोठी दुर्घटना : विरार रुग्णालयास आग: १३ जणांचा मृत्यू
ऑक्सिजनसह रेमडिसिव्हर तुटवडयाला केंद्र जबाबदार

करोना परिस्थिती हाताळण्याबाबत केंद्राकडून रोज नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली जात असून आॅक्सिजनसक रेमडिसिव्हर व लसीच्या तुटवडयाला केंद्र सरकारच जबाबदार असल्याची तोफ पालकमंत्री छगन भुजबळ यांनी डागली.

इंदीरा गांधी रुग्णालयात करोना लसीचा डोस घेतल्यानंतर शहरातील आॅक्सिजन तुटवडयावर त्यांनी भाष्य केले. राज्य शासनाची यंत्रणा उपलब्ध होईल तेथून जिल्ह्यांसाठी आॅक्सिजन उपलब्ध करुन देत आहे.

इतर ठिकाणांहून आॅक्सिजन मिळेल का यासाठी प्रयत्न सुरु आहे. एकमात्र नक्की की देशातील राज्यकर्त्यांचे कुठे काही तरी चुकत आहे. रोज नवे मार्गदर्शक तत्वे जारी करुन राज्यांना सूचना दिल्या जातात. पथक पाठवून दोष दाखवून टीका टिपण्णी केली जाते. पण ज्या जिल्ह्यात जादा रुग्णसंख्या आहे त्यास तेवढी मदत दिली जात नाही.

आॅक्सिजन असो की रेमडिसिव्हर इंजेक्शन. देशात तुटवडा निर्माण झाल्यानंतर रेमडिसिव्हरची निर्यात थांबविण्यात आली. लसीसा देखिल हाच प्रकार पहायला मिळाल्याचे सांगत भुजबळांनी केंद्रावर टीका केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com