शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे केंद्राचे दुर्लक्ष - महसूलमंत्री थोरात

शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे केंद्राचे दुर्लक्ष - महसूलमंत्री थोरात

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

गेल्या अनेक दिवसापासून दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन ( Farmers Agitation in Delhi )करत आहेत. मात्र केंद्र सरकार ( Central Government )या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांचे म्हणणे ऐकत नाही, हे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात( State Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी केले.

केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे व प्रिपेड वीजबिल विधेयका विरोधात दिल्ली व देशभर लढणार्‍यांच्या समर्थनार्थ शेतकरी जनजागृती परिषद येथील सिन्नरफाटा बाजार समितीच्या आवारात झाली. याप्रसंगी थोरात बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी अशोक खालकर होते.

याप्रंसगी खा. हेमंत गोडसे, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी खासदार देवीदास पिंगळे, आ.दिलीप बनकर, आ.हिरामण खोसकर, आ.सरोज आहिरे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, राजेंद्र डोखळे, शरद आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका राजाराम धनवटे, व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक संतोष साळवे, संपत सकाळे, संदिप गुळवे, करण गायकर, शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष शरद तुंगार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी थोरात यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या समन्वय समितीचे कौतुक केले. ते म्हणाले, केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या विरोधात असून कोणतीही चर्चा न करता कायदे मंजूर केले. व्यापारी व भांडवलदारांच्या बाजुचे केंद्र सरकार आहे. राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससह पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दिली.

यावेळी राजेंद्र डोखळे, माजी खा. देवीदास पिंगळे, अशोक खालकर आदींनी मनोगत व्यक्त केले. किसान सभेचे राजू देसले यांनी येत्या 25 सप्टेंबरला भारत बंदचा इशारा दिला. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे नाशिक जिल्ह्यात विविध भागातून येणारे ट्रॅक्टर आले नाही. सिन्नरफाटा बाजार समितीच्या आवारातून काही ट्रॅक्टराची रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी सभापती प्रशांत दिवे, नगरसेवक जगदीश पवार, व्यापारी बँकेचे संचालक वसंत अरिंगळे, अरूण जाधव, सुनील कांबळे, बाळासाहेब म्हस्के, राहुल ताजनपुरे, किरण जाधव, माजी महापौर नयना घोलप, विक्रम कोठूळे, रतन जाधव, विजय खर्जुल, रामकृष्ण झाडे, नामदेव बोराडे, शांताराम भागवत, सुखदेव गायखे, शिवाजी म्हस्के, नारायण बोराडे, रतन खालकर आदींसह शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते. परिषदचे आयोजन बहुजन शेतकरी संघटना नाशिक जिल्हा, अखिल भारतीय किसान सभा, किसान सभा, किसान काँग्रेस यांच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन रमेश औटे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com