केंद्राकडून २५ हजार मे.टन मका खरेदीस मान्यता - खा.डॉ. पवार
नाशिक

केंद्राकडून २५ हजार मे.टन मका खरेदीस मान्यता - खा.डॉ. पवार

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आजपावेतो ९० हजार मेट्रिक टन मका खरेदीकरिता क्षमतेत वाढ करून देण्यात आली होती. त्यानुसार दिलेल्या क्षमतेची पहिल्या आणि दुसऱ्या टप्यातील मका खरेदी पूर्ण करण्यात आली आहे.

परंतु , नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांकडे आज देखील चांगल्या प्रतीची मका मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. याचा विचार करता खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्राकडे पुनश्च एकदा मका खरेदी क्षमतेत वाढ करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार २५ हजार मेट्रिक टन मका खरेदी क्षमतेस मान्यता देण्यात आली आहे.

शेतकरी वर्गाने खा.डॉ.भारती पवार यांना संपर्क करून शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेली मका खरेदीसाठी अधिकची खरेदी क्षमता वाढविण्याकरिता राज्य सरकारला केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली.

तसेच खा.डॉ.भारती पवार यांनी तत्काळ केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय सचिवांकडे मागणी केली असता केद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवार दि.२२ जुलै २०२० रोजी २५ हजार मे.टन मका खरेदीस तिसऱ्यांदा क्षमता वाढवून देण्यात आल्याची माहिती दिली.

केंद्राकडून खरेदी क्षमता वाढवून देण्यात आलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल केंद्रीय मंत्री महोदयांचे खा.डॉ.भारती पवार यांनी आभार व्यक्त केले.

Deshdoot
www.deshdoot.com