स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

भारतीय स्वातंत्र्याच्या (Indian independence) अमृत महोत्सवास आज शहर-परिसरात अभुतपुर्व जल्लोषात प्रारंभ करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आवाहनानुसार ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून सर्वत्र राष्ट्रभक्तीचे (patriotism) वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून शहराच्या विविध भागात घरोघर तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयांसह सहकारी संस्था व व्यापारी प्रतिष्ठानांवर राष्ट्रीय तिरंगा (National Tricolor) डौलाने फडकविण्यात आला तर विविध शाळा-महाविद्यालयांतर्फे अपुर्व उत्साहात तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गीतांच्या ध्वनीमुद्रिकांसह भारतमाता की जय, वंदे मातरम् आदी घोषणांच्या गजराने राष्ट्रभक्तीचा (patriotism) जागर करण्यात आला. शाळा-महाविद्यालयांनी काढलेल्या रॅलींचा एकात्मता चौकात समारोप झाला.

माहेश्वरी समाजातर्फे रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज येथील माहेश्वरी समाजाच्या (Maheshwari Community) विविध संघटनांतर्फे अभुतपुर्व जल्लोषात तिरंगा रॅली काढत देशभक्तीचा जागर केला गेला. एकात्मता चौकातील जॉगिंग ट्रॅक (jogging track) येथून या रॅलीचा राज्याचे मंत्री दादाजी भुसे (Minister Dadaji Bhuse) यांनी राष्ट्रध्वज फडकावत शुभारंभ केला. या रॅलीत राष्ट्रध्वज हातात घेत ना. भुसे देखील सहभागी झाले होते. वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत रॅली मार्ग माहेश्वरी समाजबांधव व महिलांनी दणाणून सोडला होता.

येथील माहेश्वरी समाज, माहेश्वरी प्रगती मंडळ व माहेश्वरी महिला मंडळ समाजाच्या विविध संघटनांतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन आज केले गेले. राष्ट्रीय एकात्मता चौकातील जॉगिंग ट्रॅकपासून या रॅलीचा शुभारंभ मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर केला गेला. रॅलीत तीनशेपेक्षा अधिक दुचाकींवर माहेश्वरी समाजाचे महिला, पुरूष व युवक-युवती हातात तिरंगा ध्वज घेत सहभागी झाले होते.

लहान मुले ट्रॅक्टरवरून या रॅलीत सहभागी झाले. लहान मुलांनी भारत माता, महात्मा गांधी (mahatma gandhi), स्वातंत्र्यवीर सावरकर (swatantryaveer savarkar), भगतसिंग (Bhagat Singh), राजगुरू (Rajguru) यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. शहरातील वेगवेगळ्या भागातून फिरत या तिरंगा रॅलीची बालाजी मंदिर प्रांगणात राष्ट्रगीताने सांगता केली गेली. तिरंगा रॅली यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष कल्पेश हेडा, ओमप्रकाश सारडा,

महिला मंडळ अध्यक्षा पुनम नवलखा, वसुधा तापडे, सरस्वती झंवर यांच्यासह अंकुश बडाळे, गोपाळ झंवर, महेश मारू, राधेशाम काला, विशाल मंत्री, कमलेश पोरवाल, चेतन बिर्ला, जगदीश काकाणी, लक्ष्मीकांत सारडा, कौशल काबरा, ओम गगराणी, दर्शन नवलखा आदी पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com