Photo, Video : दोन वर्षानंतर ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज

Photo, Video : दोन वर्षानंतर ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज

जुने नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनामुळे (Corona) तब्बल दोन वर्षांनंतर ईदगाह मैदानावर (Eidgah Maidan) आज रमजान ईदची (Eid) विशेष नमाज पठाण करण्यात आली. यावेळी देशाच्या प्रगतीसाठी अमन, शांती कायम राहावी व देशाची प्रगती व्हावी, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. सुमारे 40 हजार भाविकांनी नमाज पठाण केले. मैदान अपुरे पडल्याने एलआयसी सिग्नल जवळ (LIC Signal) भाविकांना बाहेर नमाज पठण करावी लागली...

पवित्र ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा (Ramadan Eid) मोठा सण आज (दि. 3) मंगळवारी मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केला. तब्बल दोन वर्षांनंतर शहरातील ऐतिहासिक शाहजानी इदगाह मैदानावर सकाळी दहा वाजता सामुदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम सुरू झाला. खतीब -ए- नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठाण व इतर धार्मिक प्रक्रिया झाली.

यंदा पवित्र रमजान महिन्याचे पूर्ण 30 रोजी झाल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर खा. हेमंत गोडसे (Hemant Godse), माजी महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni), माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर दशरथ पाटील, माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, ऋतुराज पांडे, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, अक्रम खातीब, शेखन खतीब, अतिक खतीब, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,

नदीम शेख, शिवसेनेचे नाना काळे, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, सुभान शेख, माजी सभापती वत्सला खैरे, यांच्यासह पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त तथा प्रशासन रमेश पवार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, हुसेन पठाण, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, विजय धमाळ यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.