
ताहाराबाद | Taharabad
येथील मविप्र समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज, ताहाराबाद (Taharabad) येथे नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji subhash chandra bose) जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेताजींचा जीवनपट आपल्या भाषणातून उलगडून सांगितला, शाळेतील शिक्षकांनीही यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना स्मरण करून दिले.
याप्रसंगी प्राचार्या एम. जे. पानपाटील तसेच उपमुख्याध्यापिका आर. आर. सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र बच्छाव यांनी तसेच आभार के. जी. अहिरे यांनी मानले.
दरम्यान, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे, के. ए. बागुल, पी. एस. गोसावी, के.जी. अहिरे, के. बी. चव्हाण, एस. बी. सोनवणे, पी. पी. माटे, जे. एल. गावित, डी. आर. गावित, एस. पी. देवरे, के. एम. पवार, के. एम. मोरे, आर. जी. संसारे, एस. व्ही. भांगरे, एस. बी. रौदल, एस. पी. गिरी, एस. आर. दळवी, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.