रोटरीतर्फे आगळावेगळा बालदिन साजरा

रोटरीतर्फे आगळावेगळा बालदिन साजरा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रोटरी क्लब ऑफ नासिक एअरपोर्टतर्फे (Rotary Club of Nashik Airport) आगळावेगळा बालदिन (Childrens Day) साजरा करण्यात आला...

आधारतीर्थ आश्रम त्र्यंबक येथील मुलांसाठी रोटरीतर्फे दिवसभर बालदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी प्रथमच जादुई प्रयोग कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मॅजिक शोचा आनंद प्रथमच अनुभवला.

विद्यार्थ्यांनीदेखील विविध प्रकारचे संगीतमय नृत्य करून दाखवले. तसेच विद्यार्थ्यांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. विविध प्रकारचे खाण्याचे प्रकार भेटवस्तू म्हणून देण्यात आले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. ममता सुराणा यांनी मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे फार महत्त्वाचे असते. कारण हीच मुलं आपल्या देशाचे भविष्य घडवणार असतात, याबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी माजी अध्यक्ष डॉक्टर नितीन सुराणा, माजी अध्यक्ष विनोद जाधव व उपाध्यक्ष वैशाली जाधव, चेतन सोनकुळे, स्नेहल सोनकुळे, धीरज दळवी, आरती दळवी, दुहिता पटेल, नीता पटेल, दीपक भुरे, प्रीती भुरे, संकेत दशपुते, अश्विनी दसपुते, वर्षा पूर्मेवर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com