Tribal Day
Tribal Day|आदिवासी दिन सुरक्षितपणे साजरा करा : झिरवाळ
नाशिक

आदिवासी दिन सुरक्षितपणे साजरा करा : झिरवाळ

Nitin Gangurde

दिंडोरी । Dindori (प्रतिनिधी)

९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन असून यंदा करोना या महामारीच्या काळात सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे असून सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचना दिशा निर्देश नियमांचे पालन करुन सामाजिक उपक्रम राबवुन सुरक्षितपणे आदिवासी दिन साजरा करावा, असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

यावर्षी करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर ठेवत सॅनिटायझरचा वापर करणे, सर्वांनी एकत्र न येता आपापल्या परिसरात गावात घराच्या आजूबाजूस पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी झाडे लावावे.

सामाजिक हित जोपासण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करत जास्तीत जास्त रक्त संकलित करावे, झूम अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन विविध स्पर्धा आयोजित करुन नवा आदर्श ठेवावा असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com