नर्देशांचे पालन करत आगामी सण साजरा करा

शांतता समितीच्या बैठकीत ग्रामीण पोलीस अधीक्षक पाटील यांचे आवाहन
नर्देशांचे पालन करत आगामी सण साजरा करा

मालेगाव । प्रतिनिधी

शासनाच्या निर्देशाचे पालन करत जनतेने आगामी रमजान ईदचा सण साजरा करावा, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी येथे बोलतांना केले. येथील नियंत्रण कक्षाच्या सुसंवाद हॉलमध्ये आयोजित शहर शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

महाराष्ट्रासह देशात करोना महामारीने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मागील वर्षाच्या पहिल्या लाटेत मृत्यूचे प्रमाण कमी होते. परंतु या वर्षीच्या दुसर्‍या लाटेत 20 ते 25 वयोगटातील तरुणांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तसेच आगामी तिसर्‍या लाटेचे परिणाम देखील भयानक राहतील, याचा गांभीर्याने विचार करत स्वत:सह कुटुंबाचे संरक्षण करावे व करोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाच्या निर्देशाचे कठोर पालन करत सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 95 टक्के पोलीस सेवकांचे लसीकरण पूर्ण झाले असून उर्वरित सेवकांच्या लसीकरणासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचे लसीकरणासाठी आपला प्रयत्न करत मान्यवरांनी यावेळी केलेल्या सूचना या शासन दरबारी पोहचविणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे, प्रदीप जाधव, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमोद शुक्ला, केवळ हिरे, रामा मिस्तरी, अशरद मिनानगरी, रियाज अन्सारी, गुलाब पहेलवान आदींची यावेळी भाषणे झालीत.

यावेळी युसूफ इलियास, अक्तर अन्सारी, अ‍ॅड. हिदायत उल्ला, रामदास बोरसे आदींसह शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com