शिवजन्मोत्सव शांततेत साजरा करा

तहसील व पोलिस प्रशासनाचे आवाहन
शिवजन्मोत्सव शांततेत साजरा करा

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

शहरात व तालुक्यात शिवजन्मोत्सव (Shiv jayanti) साजरा करताना कोरोना नियमांचे पालन (Adherence to corona rules) करुन व शांततेत साजरी करण्याचे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे (Tehsildar Rahul Kotade) व सिन्नर पोलिस ठाण्याचे निरिक्षक संतोष मुटकुळे (Sinnar Police Station Inspector Santosh Mutkule) यांनी केले.

शिवजयंतीच्या पार्श्वभुमिवर आज (दि. 15) प्रशासकीय इमारतीत शिवजन्मोत्सव समितीसोबत (Shivjanmotsav Samiti) बैठकीचे आयोजन करण्यात आले. शिवजन्मोत्सव तीन दिवसांवर येऊन ठेपला असून कुणीही सोशल मिडीयाच्या (social media) माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट (Offensive post) न टाकण्याचे आवाहन मुटकुळे यांनी केले. समाजात कुठल्याही प्रकारचे तेढ निर्माण होणार नाही याची समितीने काळजी घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

सिन्नरमध्ये मागील काही वर्षांपासून शिवजन्मोत्सव शांततेत साजरा झाल्याचा आनंद असल्याचे कोताडे म्हणाले. यंदाही अशाच प्रकारे नियोजन करुन शिवजयंती (shiv jayanti) साजरी करण्याचे आवाहन त्यांनी समितीला केले. कोरोना (corona) अजूनही संपला नसून आपण स्वता:सह इतरांची काळजी घ्यावी. तसेच मास्क (mask) वापरुन शक्य होईल तितक्या कमी लोकांमध्ये हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन कोताडे यांनी केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती शांततेतच पार पाडणार असून प्रसाननानेही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष विठ्ठल उगले यांनी केले. उत्सवात एखाद्या व्यक्तिकडून चुकीचे काम होत असेल तर त्यांच्यावर प्रशासनाने स्वत: येवून कारवाई करण्याचे आवाहन समितीचे कार्यवाह सुभाष कुंभार यांनी केले.

तरुणांनीही उत्सवाला गालबोट लागणार नाही यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. यावेळी समितीचे उपाध्यक्ष हरिभाऊ तांबे, कैलास दातीर, कार्यवाह राजाराम मुरकुटे, सचिव नामदेव कोतवाल, दत्ता वायचळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

तारखेनूसार जयंती साजरी करा

दिनदर्शिकेवर दोन शिवजयंती असली तरी आपण सर्वांनी तारखेनूसारच शिव जयंती साजरी करण्याचे आवाहन प्रा. राजाराम मुंगसे यांनी केले. तसेच सायंकाळी कुणीही हा सोहळा साजरा न करता सकाळीच साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com