मोहरम बैठक
मोहरम बैठक
नाशिक

यंदाचा मोहरम सण देखील घरीच साजरा करा

बैठकीत निर्णय

Gokul Pawar

Gokul Pawar

जुने नाशिक | Old Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी मोहरम सण देखील मुस्लिम समाजाला घरीच साजरा करावा लागणार आहे. शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक सण-उत्सवाची अद्याप परवानगी दिलेली नाही, यामुळे मोहरमचे देखील सर्वप्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम यंदा होणार नाही. नुकताच भद्रकाली पोलिस ठाण्यात मोहरम निमित्ताने विशेष बैठक झाली. यावेळी एकमत झाले.

मोहरमच्या एक तारखेपासून इस्लामी नवीन वर्षाला देखील प्रारंभ होतो, तर याचे पहिले दहा दिवसांना विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. नाशिक शहरात पारंपरिक पद्धतीने ठिकाणी ताजिया देखील तयार करण्यात येते तर मानाच्या ताजिया सारडा सर्कल येथील इमाम शाही येथे तयार करण्यात येतो. या ठिकाणी जत्रा देखील भरते, मात्र यंदा निवडक लोक परंपरेप्रमाणे ताजिया तयार करतील, मात्र कोणत्याही प्रकारचे गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे बागवानपुरा, कोकणीपुरा, चौक मंडईसह शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या मोहरमनिमित्त प्रवचनाचे कार्यक्रम देखील यंदा रद्द करण्यात आले आहेत.

भद्रकाली पोलिस ठाण्यात झालेल्या विशेष बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांच्यासह पोलिस अधिकारी तसेच हाफिज हिसामुद्दीन अशरफी, एजाज रजा, शेखन खतीब, शाकीब भुरे आदी मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com