नाशिक पोलीस
नाशिक पोलीस
नाशिक

कायद्याच्या चौकटीत सण उत्सव साजरे करा

बकरी ईद बैठकीत पोलिसांचे आवाहन

Gokul Pawar

Gokul Pawar

जुने नाशिक | Old Nashik

सध्या करोनामुळे सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना शासनाने मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने विशेष आदेश काढून सण उत्सव साजरी करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनी सूचनांप्रमाणे कायद्याच्या चौकटीत राहून सर्व प्रकारचे सण-उत्सव साजरे करावेत असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

आज आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलीस ठाणेच्या वतीने अशोका मार्गावरील एका सभागृहात विविध मशिदींची इमाम, विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील मान्यवर यांची संयुक्त समन्वय बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ठिकठिकाणी या प्रकारे बैठक घेण्यात येऊन लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. असे उपायुक्त तांबे यांनी सांगितले.

बैठकीत उपस्थितांपैकी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना आगामी ईदच्या दिवशी मशिदींमध्ये एका वेळेला पन्नास जणांना नमाज पठण करण्याची परवानगी मिळावी, ईदगाह मैदानावर हजार लोकांना एकावेळी नमाज पठण करण्याची परवानगी मिळावी व कुर्बानीसाठी काही प्रमाणात सूट मिळावी आदी मागण्या केल्या होत्या.

यावरही उपायुक्त तांबे यांनी समाजाच्या भावना वरिष्ठ अधिकारी तसेच शासनदरबारी आम्ही पोहोचणार, मात्र शासन निर्णय देतील त्या पद्धतीनेच आपण सर्वजण सणउत्सव साजरी करायला बांधील असून पोलीस प्रशासन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील विवीध मशिदींचे ईमाम विश्वस्त तसेच मान्यवर उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com