ईद शांततेत साजरी करा : वाघ

ईद शांततेत साजरी करा : वाघ

लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon

करोना (corona) प्रादूर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून परिसरातील मुस्लिम बांधव (muslim community) अतिशय साध्या पद्धतीने ईद साजरी (Eid celebration) करत होते.

यंदा मात्र करोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आल्यामुळे राज्य सरकारने (state government) निर्बंध मुक्त केले असल्याने मुस्लिम बांधवानी जातीय सलोखा राखत रमजान ईद (Ramadan Eid) शांततेत साजरी करावी असे आवाहन स.पो.नि. राहूल वाघ यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे सद्या अल्पावधीत मिळणार्‍या ऑनलाईन लोन (Online loan) च्या तक्रारी वाढल्या असल्यामुळे अनधिकृत ऑनलाइन लोन पासून युवकांनी व नागरिकांनी सावधानता बाळगावी असेही राहूल वाघ यांनी सांगितले. लासलगाव पोलीस ठाणे (Lasalgaon Police Thane) हद्दीतील 44 गावातील शांतता समितीची बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ (Assistant Inspector of Police Rahul Wagh) यांचे उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे (Sub-Inspector of Police Adinath Kothule), उपसरपंच अफजल शेख उपस्थित होते. यावेळी लासलगावसह टाकळी, विंचूर, गोंदेगाव, रुई, धारणगाव वीर, खडकमाळेगाव, देवगाव येथील मशिदीचे मौलाना, ट्रस्टी, मुस्लिम समाजबांधव व पोलीस पाटील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.