नाशिक मनपाच्या कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्हीचा वॉच

नाशिक मनपाच्या कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्हीचा वॉच
USER


नाशिक । Nashik
महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु केले आहेत; मात्र या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे नातेवाईक नाहक गर्दी करतात, तसेच काही वेळ उपचार करणार्‍या डॉक्टरांशी व सेवकांशी हुज्जत घालतात, तर अप्रिय घटना झाल्यानंतर डॉक्टरांना शिवीगाळ, तसेच काही ठिकाणी तोडफोडीचेही प्रकार घडले आहेत.

या गंभीर बाबी लक्षात घेता महापालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामुळे त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास सीसीटीव्हीच्या फुटेजद्वारे कळू शकणार आहेत.


महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात 22 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेर्‍यांमुळे आता त्या सदैव लक्ष राहणार असल्यामुळे संबंधितांनाही आता काही कारवाया करता येणार नाहीत. झाकीर हुसेन रुग्णालयाप्रमाणेच नाशिकरोड येथील नवीन इमारतीत असलेल्या बिटको रुग्णालयात 80 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

या रुग्णालयाची इमारत मोठी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅमेन्यांची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी एका माजी नगरसेवकाने थेट चारचाकी रुग्णालयात घालून राडा केला होता.


समाजकल्याण येथील कोविड सेंटरमध्ये 8, तर मेरी येथील कोविड सेंटरमध्ये 8 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेन्यांची मागणी वैद्यकीय व आरोग्य विभागाकडून करण्यात येते. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.

कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांसाठी गरम पाण्याची व्यवस्था रहावी म्हणून हॉट वॉटर फिल्टरही बसविण्यात आले आहेत. विद्युत विभागाकडून या प्रकारची कामे करण्यात आली असून, बिटको रुग्णालयात 16, समाजकल्याण येथे 4, तर झाकीर हुसेन रुग्णालयात 4 याप्रमाणे 24 हॉट वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत.

यामुळे बाधित रुग्णांना पिण्यासाठी गरम पाण्याची सोय त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


त्याचप्रमाणे गरम पाण्याबरोबरच शुद्ध पाण्यासाठी नातेवाईक व रुग्णांना व्यवस्था म्हणून अ‍ॅरो मशीन बसविण्यात आले आहेत. बिटको, झाकीर हुसेन व समाजकल्याण या रुग्णालयांच्या प्रत्येक मजल्यावर अ‍ॅरो मशीन बसविण्यात आल्यानंतर उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनाही पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत आहे. या सर्व सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत

Related Stories

No stories found.