संजीवनी शाळेस सीसीटीव्ही कॅमेरे

कपोते कुटुंबाची सामाजिक बांधिलकी
संजीवनी शाळेस सीसीटीव्ही कॅमेरे

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

येथील भुमिपुत्र व मुंबई महानगरपालिकेतील (Mumbai Municipal Corporation) दक्षता विभागाचे सेवानिवृत्त वरिष्ठ निरिक्षक विजय कपोते (Retired Senior Inspector Vijay Kapote) यांनी आपल्या आई-वडीलांच्या स्मरणार्थ शहरातील संजीवनी शाळेस (Sanjeevani School) 43 ऑडिओ व व्हिडीओ (Audio and video) असलेले सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV cameras) भेट देऊन सामाजिक बांधिलकी (Social commitment) जपली.

कपोते यांचे वडील दत्तात्रय कपोते हे नाशिक (nashik) शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी विद्यार्थी होते. सिन्नरशी (Sinnar) असलेले रुणानुबंध त्यांनी जपत शाळेतील (school) विद्यार्थ्यांच्या (students) सुरक्षितेसाठी त्यांनी हे कॅमेरे भेट दिले. यासाठी संस्थेच्यावतीने त्यांचे आभार मानण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील लेझिम पथकाने कपोते कुटुबातील सर्व सदस्यांचे स्वागत केले. यानंतर सीसीटीव्हींचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र कलाल होते. व्यासपिठावर विजय कपोते, त्यांच्या पत्नी अर्पणा कपोते, मुलगा विनोद कपोते, स्वप्निल कपोते, सुना अश्विनी कपोते, दिपाली कपोते, संस्थेचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला, ब. ना. सारडा विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष बापूसाहेब पंडीत, संजीवनी शाळेचे शालेय समिती अध्यक्ष अनिल करवा, चांडक कन्या विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, अविनाश कपोते यांच्यासह कपोते कुटुंबाचे आप्तेष्ठ उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कलाल यांनी कपोते कुटुंबाचा संस्थेला अभिमान असल्याचे सांगितले. दानाचा उपयोग हा चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. कपोते यांनी सीसीटीव्ही भेट देत शाळेविषयी रुणानुबंध जपत त्यांनी सीसीटीव्हीमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा करण्यास सोपे होणार असल्याचे ते म्हणाले.

आई-वडीलांची प्रेरणा : कपोते

आई-वडीलांनी केलेल्या संस्कारामुळेच हे करु शकलो. त्यांच्यामुळेच सिन्नरबद्दल नेहमीच मनात प्रेम होते. काहीतरी करण्याची इच्छा वाटत होती. मात्र, कामाच्या व्यापामुळे काही गोष्टी शक्य होत नव्हते. मात्र, आज त्यांच्या प्रेरणेने त्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेस सीसीटीव्ही भेट दिल्याने समाधान होत असल्याचे कपोते यांनी सांगितले

कुटुबांचे जुने नाते : पंडीत

सिन्नर शहर व वावी येथे मोठ्या प्रमाणावर कपोते कुटुब वास्तव्यास आहे. राजेंद्र कपोते यांचे वडील, काका सर्व याच शाळेत शिकले आहे. या कुटुंबामधील अनेकांनी शाळेच्या विविध कामांसाठी देणगी दिली आहे. कपोते कुटुंबाने सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही भेट देऊन शाळेप्रती ऋन व्यक्त केल्याचे बापुसाहेब पंडीत यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com