क्रिप्टो चलन वापरताना खबरदारी गरजेची - डॉ. गोविलकर

क्रिप्टो चलन वापरताना खबरदारी गरजेची - डॉ. गोविलकर

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

चलनाचा (currency ) प्रमुख वापर हा वस्तूंची देवाण घेवाण करणे हा असतो. मात्र क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency )ही गुंतवणुकीचे साधन बनले आहे. या साधनाचा वापर सध्या जरी वाढला असला तरी यात गुंतवणूक करतांना खबरदारी बाळगणे गरजेचे (You need to be careful when investing )असल्याचे मत अर्थतज्ञ प्रा.डॉ. विनायक गोविलकर (Economist Prof.Dr. Vinayak Govilkar )यांनी व्यक्त केले.

येथील बार्नस्कुल रोडवरील शिक्षण मंडळ भगूर संस्थेच्या वतीने स्व. डॉ.म.बा.कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानाचे आयोजन शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले होते.

यावेळी डॉ. गोविलकर यांनी मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, त्याचे स्वरूप, सुरक्षितता, क्रिप्टो करन्सीला शासनाने पाठिंबा न देण्यामागची कारणे, जागतिक पातळीवर क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून होणारी उलाढाल, फसवणूक आदी बाबींविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली.

चलनाच्या निर्मितीपासून ते सध्याच्या इंटरनेटच्या युगातील आभासी चलनापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगितला. यावेळी प्रा.डॉ.राम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे यांनी स्व. डॉ. म. बा. कुलकर्णी यांच्या स्वभावातील गुणविशेष सांगत विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी बिटको महाविद्यालयाचे प्रा. अनिल सावळे, शिक्षण मंडळाचे सहकार्यवाह मधुसूदन गायकवाड, डॉ. बी.एस.देशमुख, जितेंद्र भावसार, तन्मय पाटील, प्रा. मृत्युंजय कापसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संदीप घेगडमल तर प्रा. राणी झनकर यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.