चाकूचा धाक दाखवत रोकड लंपास

चाकूचा धाक दाखवत रोकड लंपास

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दोघांना चाकूचा धाक दाखवून showing fear of knives जातीवाचक शिवीगाळ abused करीत चौघांनी मिळून कार आणि रोकड बळजबरीने stolen cash घेऊन पळ काढल्याची घटना आडगाव शिवारात घडली.

याप्रकरणी सागर विश्वनाथ आगळे (३४, रा. कल्याण) यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिस ठाण्यात चौघांविरोधात जबरी चोरीसह ॲक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर यांच्या फिर्यादीनुसार, १६ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचा मित्रासह एमएच ०५ डीएस ३०७२ क्रमांकाच्या कारने ते नाशिकला भाजीपाला खरेदीसाठी आले हाेते. त्यावेळी संशयित आरोपी दत्ता कुटे, कल्पेश शिंदे, गणेश शिंदे व आणखी एकाने जेवनासाठी बाहेर जाऊ असे सांगून सागरच्या कारमध्ये बसले.

आडगाव शिवारात आल्यानंतर संशयितांनी सागरसह त्यांच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ करीत चाकूचा धाक दाखवून कारसह ६०० रुपये बळजबरीने घेत चौघांनी पळ काढला. याप्रकरणी आडगाव पोलिस Adgaon Police Station तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com