नववर्षात 'ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह'चे एकूण 'इतके' केसेस; हजारोंचा दंड वसूल

नववर्षात 'ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह'चे एकूण 'इतके' केसेस; हजारोंचा दंड वसूल

नाशिक । प्रतिनीधी | Nashik

सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे (new year) स्वागत करतांना कायदा व सुव्यवस्थेचा (Law and order) प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे (Nashik District Rural Police Force) पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Superintendent of Police Shahaji Umap) यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील 40 पोलीस ठाणेनिहाय विशेष चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील महामार्ग, वर्दळीचे ठिकाणे, चेक पोस्ट आदी ठिकाणांवर बॅरिकेटस् लावून सतर्क नाकाबंदी करण्यात आली होती. ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हवर (Drunk and Drive) लगाम लावण्यासाठी पोलीस (police) ब्रिथ अ‍ॅनालायझर मशीन (Breath Analyzer Machine) वापरण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, जिल्हा वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय स्तरावरील पथके, विशेष पथके, साध्या वेशातील पोलीस अधिकारी व अंमलदार असा बंदोबस्त तैनात होता.

31 डिसेंबरच्या रात्री कारवाईत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या (Drunk and Drive) एकूण 134 केसेस करून 79 हजार 100 रूपये दंड वसूल केले. त्याचप्रमाणे अवैधरित्या मद्याची विक्री (Illegal sale of liquor) व वाहतूक करणार्‍यावर (एकूण 53) कारवाई करून 7,84,380 रूपये किमतीतचा मुद्देमाल, तसेच अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार सदराखाली एकूण 7 केसेस करण्यात आले असून 14,01,715 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच आरोपींवर सी.आर.पी.सी. (CRPC) प्रमाणे एकूण 18 प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आहे. तसेच हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट या ठिकाणांवर फिक्स पॉईंट लावून वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षात्मक योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली होती. याशिवाय महामार्ग व रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क पेट्रोलिंग ठेवण्यात आली होती. तसेच सोशल गॅथरींग व रिसॉर्ट चेक करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस व दामिनी पथकांस तैनात करण्यात आले होते.

असे होते नियोजन

  • बंदोबस्त दरम्यान जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे, रिसॉर्ट, हॉटेल्स्, ढाबे, मॉल्स् आदी परिसरात साध्या वेशातील पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली होती.

  • जिल्ह्यातील महामार्ग तसेच वर्दळीच्या ठिकाणांवर लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान प्रत्येक वाहन चालकाची ब्रेथ अ‍ॅनालायझव्दारे तपासणी करण्यात आली.

  • राज्य व राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने चालणार्‍या वाहनांवर प्रतिबंध होण्यासाठी स्पीड गन लावून वाहनांचा स्पीड चेक करण्यात आला आहे.

  • राज्य व राष्ट्रीय महामार्गावर परराज्यातून होणारी अवैधरित्या मद्याची विक्री व वाहतुकीस प्रतिबंध होणेसाठी चेकपोस्टवर सतर्क नाकाबंदी होती.

  • मद्यप्राशन करून बेधुंद अवस्थेत मस्ती करणारे, गोंधळ घालणारे व ट्रिपलसीट वाहन चालविणारे इसमांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली.

  • सर्व संभाव्य पार्टी, रिसॉर्टमध्ये अंमली पदार्थासाठी स्नीफर डॉगव्दारे तपासणी करण्यात आली.

  • जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंंबकेश्वर, घोटी, वाडिवर्‍हे व नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीतील रिसॉर्ट, हॉटेल्स् याठिकाणी असलेल्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर होती.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com