नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात

सहायक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड पोलिसांना सूचना देताना
सहायक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड पोलिसांना सूचना देताना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील प्रमुख विशेष करून गंगापूर रोड, कॉलेज रोड येथील रस्त्यांवर दुचाकीला कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर लावून भरधाव वेगाने चालणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दुचाकीचा कर्णकर्कश आवाज काढून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दुचाकीचालकांवर (Bike) आता पोलिसांनी (Police) गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे...

सहायक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड पोलिसांना सूचना देताना
भारतीय रेल्वेची 'ही' सुविधा बंद होण्याची शक्यता

दोन दिवसांपूर्वी शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोड, शरणपूर रोड, महात्मा गांधी रोड, चोपडा लॉन्स परिसर, गंगाघाट परिसर तसेच वडाळा पाथर्डी रस्ता, पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्ता, गजानन महाराज मार्ग, श्रीकृष्ण चौक ते राणेनगर चौफुली, पेठेनगर रस्तासह परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर दुचाकीला कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून दुचाकीस्वार भरधाव वेगाने पळवण्याच्या घटना दिवसागणिक वाढत चालल्या होत्या. त्याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत सायलेंन्सरच्या फटफट आवाजाचे (Sound) फटाके फोडणाऱ्या दुचाकीचालकांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.

सहायक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड पोलिसांना सूचना देताना
नाशिक : शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

दरम्यान, या मोहीमेत शनिवारी (दि.६) दुपारच्या सुमारास पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऋतिक प्रकाश दुजडे (१९, देवळाली कॅम्प) (एम एच १५ एच झेड १४८०) दुचाकी भरधाव वेगाने सायलेंन्सरमधून कर्णकर्कश आवाज करीत वेगाने गाडी चालवत होता, म्हणून त्याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या मोहिमेमुळे ध्वनी प्रदूषण करून लोकांना त्रास देणाऱ्या दुचाकी चालकांवर चांगला वचक बसत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com