Nashik News : लाचखोर सुनीता धनगर यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल; तब्बल 'इतक्या' लाखांची मालमत्ता जमा

Nashik News : लाचखोर सुनीता धनगर यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल; तब्बल 'इतक्या' लाखांची मालमत्ता जमा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-corruption Department) पथकाने नाशिक महापालिकेत कारवाई करून ५० हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना तत्कालीन शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांना रंगेहात पकडले होते. त्याचप्रमाणे लिपिक जोशी याला देखील ताब्यात घेण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज लाचखोर धनगर यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल करून तब्बल ९६ लाखांपेक्षा जास्त रकमेची अपसंपदा जमा केली....

Nashik News : लाचखोर सुनीता धनगर यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल; तब्बल 'इतक्या' लाखांची मालमत्ता जमा
Maratha Andolan : जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिकरोडला महाविकास आघाडीचे आंदोलन

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड पोलीस ठाण्यात चौकशी अधिकारी संदीप बबन घुगे (पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सुनिता सुभाष धनगर (वय ५७ वर्ष, व्यवसाय-नोकरी प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी, तत्कालीन नेमणूक- नाशिक महानगरपालिका, नाशिक राहणार- फ्लॅट नंबर 801, रचित सनशाइन अपार्टमेंट, उंटवाडी, नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News : लाचखोर सुनीता धनगर यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल; तब्बल 'इतक्या' लाखांची मालमत्ता जमा
Video : नाशकात मराठा समाजाकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी

१५ जून २०१० ते  ३ जून २०२३ या काळात धनगर शासकीय सेवेत लोकसेवक म्हणून कार्यरत असताना ही माया गोळा करून गुन्हा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कायदेशीर ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक अशी ९६ लाख ४३ हजार ८०९ रुपये (६४.८३टक्के) इतकी मालमत्ता गोळा करण्याचे काम त्यांनी केले होते.

Nashik News : लाचखोर सुनीता धनगर यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल; तब्बल 'इतक्या' लाखांची मालमत्ता जमा
Maratha Andolan : जालन्यातील घटनेचा त्र्यंबकेश्वरला निषेध

तसेच लाचखोर (Bribe Taker) सुनिता धनगर यांच्या मालमत्तेची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे सुरू होती. या चौकशीत त्यांनी २०१० ते २०२३ दरम्यानच्या काळात शासकीय सेवेत लोकसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या कायदेशीर स्त्रोतापेक्षा ९६,४३, ८०९ रुपये अधिक अपसंपदा जमा केल्याचे समोर आले आहे. म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनयम १९८८ चे कलम १३ (१) (ब ) १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik News : लाचखोर सुनीता धनगर यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल; तब्बल 'इतक्या' लाखांची मालमत्ता जमा
Nashik News : निफाड परिसरात पावसाची जोरदार हजेरी
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com