अखेर 'त्या' चार कोटींच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

अखेर 'त्या' चार कोटींच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इगल इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (EAGLE ELECTRONICS INDIA PRIVATE LIMITED) या कंपनीच्या संचालकांवर चार कोटी रुपयांचा अपहार (Embezzlement) केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य राधेश्याम मालीवाल (३३, रा. इशदया, अक्षय रीजन्सीच्या बाजूला, शंभूनगर, गारखेडा, औरंगाबाद) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार इगल इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकिसन खेमानी व श्रीनाथ अहिरवाडकर यांनी संगनमताने (दि.५ मार्च २०२० ते १५ सप्टेंबर २०२२) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील वितरकांकडून (Distributors) गुंतवलेल्या रकमेवर जास्त आर्थिक फायदा करून देण्याचे अमिष दाखवून सर्वांचे मिळून ४ कोटी ६ लाख ८ हजार २१६ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

दरम्यान, आता याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी दत्तात्रय पवार (Dattatraya Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी के.पी.खांडवी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com