
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
राणेनगर (Ranenagar) परिसरातील स्वामी विवेकानंद पुतळ्या शेजारील जागा महापालिकेकडे (NMC) हस्तांतरित झाली असतानादेखील सिडको प्रशासकांनी आपल्या पदाचा गैरवापर करत दोघांच्या मदतीने कागदपत्रांवर खाडाखोड करून विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला...
याबाबत राजय प्रभाकर कुरे (५५,सिडको प्रशासक कार्यालय औरंगाबाद नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार (दि.२६ ऑक्टोबर २०२१ ते १७ नोहेंबर २०२१ ) सिडकोची सर्व्हे नंबर ९२९, सेक्टर १४ बी, नेबरहूड, मार्गशीष पॉकेट क्रमांक बी १४,एकूण क्षेत्र ३७५९ चौरस मिटर,सेक्टर एन ८ या जागेचे नाशिक महानगरपालिकेकडे हस्तांतरण झाले.
तरीदेखील तत्कालीन प्रशासक जी.व्ही.ठाकूर,लिपिक हर्शद हयात खान व ज्ञानेश्वर बाबुराव सोनवणे यांनी गैरमार्गाने संगनमत करून कोणताही अधिकार नसतांना (जा. क्र. ३२३७ दि. २६ ऑक्टोबर २०२१) च्या वाटपपत्राद्वारे ज्ञानेश्वर बाबुराव सोनवणे यांना सदर जागा विक्री केली.
त्यामध्ये ज्ञानेश्वर या नावात खाडाखोड आहे. दिवाणी न्यायालय संचालक मंडळ ठराव क्र. ५७५९ च्या आदेशानुसार वाटपपत्र हा संदर्भ चुकीचा आहे. सिडकोच्या खात्यावर जमा करण्याकरिता वापरण्यात आलेले चलन न.३६६४१ यावर व्हाईटनर लावून अंकांची खाडाखोड केल्याचे स्पष्ट दिसून आले.
तसेच चलन न. ३६६४१, ३६६४२, ३६६४३, ३६६४४ हे चारही चलन ज्ञानेश्वर बाबुराव सोनवणे यांच्या नावावर असल्याने त्यावर काम करणारे लिपिक हर्शद खान यांनी संशयास्पद काम केल्याचे निदर्शनास आले. यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार तिघा संशयितांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण शेवाळे करत आहेत.