विषबाधेने विद्यार्थी दगावले प्रकरण : निवासी शाळेला मान्यता नसल्याचे उघड

विषबाधेने विद्यार्थी दगावले प्रकरण : निवासी शाळेला मान्यता नसल्याचे उघड

घोटी | वार्ताहर Ghoti

अन्नातून विषबाधा ( Food poisoning )होऊन दगावलेल्या मुकबधीर, कर्णबधीर निवासी शाळेला शासनाची मान्यता नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.शहरात असलेल्या अनुसयात्मजा मतीमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र ही शाळा चालवणारी संस्था मुंबईतील पुण्यात्मक प्रभाकर शर्मा सेवा मंडळ (Punyatma Prabhakar Sharma Seva Mandal)संचलन करते.

नमूद तिन्हीही संस्थाचे रजिस्टर नोंदणी क्रमांक ए - 1083 असा आहे. मात्र शासनाने गतिमंद, कर्ण व मूकबधीर विद्यार्थाना निवासी ठेवण्याची कोणतीही परवानगी दिलेली नाही. अशा संस्थाना फक्त गतिमंद कर्ण, मुकबधिर विद्यार्थानां स्थलांतरीत करून त्यांची देखभाल करण्याची 40 विद्यार्थी संख्या निश्चित केली असताना येथे अनधिकृतपणे 120 विद्यार्थ्यांना प्रवेश देवून निवासी ठेवण्यात आलेले होते.

या शाळेत गतिमंद मुकबधीर, कर्णबधीर विद्यार्थी गेली तीन महिन्यांपासून आजारी असताना शाळा व्यवस्थापनाने आजारी विद्यार्थाचा उपचार खासगी डॉक्टरांकडे केला. ग्रामीण रुग्णालय व शासकीय रुग्णालयात उपचार होत नाही म्हणून पालकच खासगी रूग्णालयात उपचाराचा अट्टाहास करीत असल्याचे मुख्याध्यापिका हेमलता जाधव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. निवासी शाळेत फक्त 74 पटसंंख्या राहिली आहे. जिल्हाधिकार्‍यांसह, जिल्हा चिकित्सकांंनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एक आठवड्यासाठी ग्रामीण रूग्णालयातील एक डॉक्टर, एक पारिचारिका, एक औषधे विभाग कर्मचारी असे आरोग्यपथक विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी नेमले आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

घटनेतील गांभीर्य पहाता निवासी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता सर्व काही व्यवस्थीत आहे. तरीही या घटनेतील विद्यार्थ्यांनां एक आठवडा वैद्यकीय पथक लक्ष देवून आहे. मृत्यु झालेल्या दोन विद्यार्थाच्या अन्न, पाणी, रक्त यांचा तपासणी अहवाल आल्या नंतर पुढील तपास करण्यात येईल.

- डॉ. एम. बी. देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी

गतिमंद, कर्णबधीर, मूकबधिर निवासी शाळेत अनेकदा अशा घटना होतात. त्यामुळे जिल्हा समाज कल्याण विभाग व सबंधित प्रशासनाने सर्व निवासी शाळेचे ऑडीट करून अनधिकृत संस्थावर कारवाई करावी. _

- किरण फलटणकर, जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com