महावितरणच्या लिपीकास मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

महावितरणच्या लिपीकास मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक । Nashik

महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या नाशिक मंडल कार्यालयातील उच्चस्तर लिपिक महेश अशोकराव कवडे हे तपोवन भागातील थकबाकीदार ग्राहकाला वीज देयकाच्या भरणा करण्यास सांगून आपले कर्तव्य बजावीत असताना याचा राग येऊन त्यांना काशी मंगल कार्यालयाचे मागे नाशिक येथे शुक्रवारी मारहाण व शिवीगाळ करण्यात आली होती.

महावितरणचे लिपिक महेश कवडे हे तंत्रज्ञ रामदास गांगुर्डे यांचे समवेत शुक्रवारी तपोवन लिंक रोड जवळील ग्राहक गणपती भोंग यांना थकीत वीज देयकाचा भरणा करण्यास सांगून तेथून काशीमंगल कार्यालयाचे मागे गेले असता तेथे संशयित समर माळी व त्याचा मित्र यांनी त्यांना अडविले.

वीज देयकाची मागणी करीता घरी का गेले या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली आणि सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांचे विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशनला महेश कवडे यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com