द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणार्‍या संशयितांवर गुन्हा दाखल

द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणार्‍या संशयितांवर गुन्हा दाखल

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यात( Dindori Taluka ) द्राक्ष उत्पादकांच्या ( Grapes Growers ) फसवणुकीचे ( fraud ) दृष्टचक्र सुरुच असून, जोपूळ येथील पाच द्राक्ष उत्पादकांना 14 लाख 24 हजार 418 रुपयांना गंडा घालणार्‍या दहा संशयितांवर संगनमताने विश्वासघात करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाडवा अ‍ॅग्रिकल्चर कंपनीच्या नावाने जोपूळ येथील भगवान उध्दव उगले, चंद्रभान नारायण उफाडे, रावसाहेब लक्ष्मण जाधव, सुभाष पुंडलिक कड आणि कुसुम विष्णू तडाखे या शेतकर्‍यांकडून एकूण 14 लाख 24 हजार रुपयांची द्राक्षे खरेदी करण्यात आली होती.

त्याबदल्यात संबंधितांना त्या रकमांचे धनादेश देण्यात आले होते, मात्र धनादेश वटू नये व उत्पादकांना द्राक्षमालाचे पैसे मिळू नये, यासाठी संबंधितांनी स्टॉप पेंमेट करुन रक्कम गोठविली.त्यानंतर संगनमताने कट रचून फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत दिली.

अमित अरुण देशमुख, भूषण दिलीप पवार, विशाल मारुती विभुते, अमोल अविनाश चव्हाण, अविनाश चव्हाण, सागर गजानन जगताप, संतोष तुकाराम बोराडे, प्रशांत ज्ञानदेव भोसले, दीपक ज्ञानदेव भोसले, सयाजीराव दीपक भोसले या दहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दिंडोरी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com