वाहन तोडफोड प्रकरणी सात जणांवर गुन्हा

वाहन तोडफोड प्रकरणी सात जणांवर गुन्हा

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गायखे कॉलनी व पंजाब कॉलनी या ठिकाणी शनिवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी हातात लाठ्या-काठ्या, दगड, विटा, कोयते घेऊन दहशत निर्माण केली होती. त्याचप्रमाणे घराबाहेर असलेल्या वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडण्यात आल्या....

तसेच घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

परिणामी पोलिसांनी या घटनेप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शनिवारी मध्यरात्री गायखे कॉलनी व पंजाब कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरावर तसेच वाहनांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले होते.

घटनेप्रकरणी मिनल भगवान बोरणारे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर उपनगर पोलिसांनी अभिनव कुरे (रा. नेहरूनगर), आकाश इंगळे (रा. खर्जुल मळा, राठा कॉलनी), विकी वरखडे (रा. तरण तलावाजवळ, नाशिकरोड), यश पगारे (रा. जेत्वननगर, नेहरूनगर), विशाल चाफळकर व गोपाळ कुरे या सात जणांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी यापैकी पाच जणांना अटक केली आहे तर दोन जण अद्याप फरार आहे.

दरम्यान या घटनेनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ गोडसे, अशोक साळवे, भागवत भोर, गणपती काकड आदींनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींवर कडक कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com