मेडिकल चालकाकडून रुग्णास मारहाण; गुन्हा दाखल

लासलगाव येथील घटना
मेडिकल चालकाकडून रुग्णास मारहाण; गुन्हा दाखल

लासलगाव | Lasalgoan

कसबे सुकेणे येथील मोरे कुटुंबीय पॉझिटिव्ह निघाल्याने लासलगाव येथील कातकडे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.

मात्र संजीवनी मेडिकल येथून घेतलेल्या औषधांचे मेडिकल बिलामध्ये तफावत आढळल्याने मेडिकलचे संचालक गणेश फड आणि मोरे यांच्यामध्ये बाचाबाची होत हाणामारी झाली. गणेश फड व मेडिकल मधील मुलाने मारहाण केली.

यामध्ये महिलेलाही धक्काबुक्की झाली असून याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गणेश फड यांच्या पत्नीनेही परस्पर फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुकेणे येथील मोरे यांचे कुटुंब हे पॉझिटिव्ह निघाल्याने लासलगाव येथील कातकडे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. दरम्यान कातकाडे हॉस्पिटल समोरील संजीवनी मेडिकल मधून घेतलेल्या औषध गोळ्यांचे बिल मागितले असता मेडिकल संचालक गणेश फड याला राग आला. बिलामध्ये एक हजार रुपयांचा फरक असल्याने रुग्णांचे नातेवाईक व गणेश फड यांच्यात वादावादी झाल्याने गणेश फड यांच्या मेडिकल मधील कामगार इतर तीन अशा पाच जणांनी मिळून रुग्णाला मारहाण केली.

एका महिलेला धक्काबुक्की केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मेडिकल संचालक गणेश फड व इतर जणांविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच गणेश फड यांच्या पत्नीनेही याबाबत परस्पर तक्रार दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com