आशेवाडी ग्रामपंचायत मधील घोटाळ्याविरोधात गुन्हा दाखल

आशेवाडी ग्रामपंचायत मधील घोटाळ्याविरोधात गुन्हा दाखल

दिंडोरी। प्रतिनिधी

तालुक्यातील बहुचर्चित आशेवाडी ग्रामपंचायतीच्या विकासकांमाच्या सुमारे 37 लाखांचे शासकीय निधीच्या अपहार प्रकरणी ग्रामसेवकासह विद्यमान सरपंच उपसरपंच यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस स्थानकात विस्तार अधिकारी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की तालुक्यातील आशेवाडी ग्रामपंचायतीत 15 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 दरम्यान विविध विकासकामांसाठी आलेला शासकीय निधी त्यासाठी न वापरता ग्रामसेवक दिलीप वामनराव मोहिते रा.साकोरे मिग, सरपंच श्रीमती जिजाबाई कचरू तांदळे व उपसरपंच श्रीमती सुनीता संजय बोडके रा आशेवाडी या तिघांनी त्यांचे ओळखीच्या चार इसमांचे नावे धनादेश,आर्टीजीएस व रोख रुपये 37,30,089 (रुपये सदोतीस लाख तीस हजार एकोनव्वद ) अदा करत ती रक्कम पुन्हा त्या इसमांचे खात्यातून काढून घेतली.

तिघांनी संगनमत करत अपहार केल्याची तक्रार पंचायत समिती दिंडोरीचे विस्ताराधिकारी आण्णा किसन गोपाळ यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली असून दिंडोरी पोलिसांनी तिघांविरोधात भा.द. वि. कलम 403,408,409,420,34 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कौठे अधिक तपास करत आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com