फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

नाशिक । Nashik

नाशकातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्यासह गिरीश महाजन दौऱ्यावर बिटको रुग्णालयात दिली. यावेळी बिटको रुग्णालयाची पाहणी करत, वैद्यकीय सुविधांचा आढावा घेत काही त्रुटी दूर करण्याच्या सूचना केल्या. हि पाहणी करत असताना काही जणांनी याचा व्हिडीओ चित्रित करत शिवराळ टिप्पणीसह असलेला हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला.

यांनतर भाजपचे हेमंत गायकवाड यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यांनंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवत व्हिडीओ शेअर करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com