नगरसेविका पतीविरोधात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल

बिटको हॉस्पिटल तोडफोड प्रकरण
नगरसेविका पतीविरोधात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिकरोड | Nashik

येथील नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी शनिवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास...

आपल्या ताब्यात असलेली इनोवा कार क्रमांक एम एच 15 इ इ 7799 ही गाडी नवीन बिटको हॉस्पिटल च्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या काचेच्या दरवाजातून घुसून तोडफोड केल्याप्रकरणी राजेंद्र ताजणे यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात डॉक्टर अतुल विजय सोनवणे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामात अडथळा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आली असून त्याचप्रमाणे इनोवा कार मधी घुसवून पेवर ब्लॉक फेकून नरस वर कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच प्रमाणे रुग्णाचे नातेवाईक देवा मल्हारी बोडके यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. सदर घटनेनंतर राजेंद्र ताजने हे घटनास्थळावरून फरार झाले.

याप्रकरणी पुढील तपास नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान राजेंद्र ताजणे यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com