नाशकात भाजप शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

नाशकात भाजप शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

नवीन नाशिक व इंदिरानगर (Indiranagar) परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करून पोलिसांची (Police) कुठलीही परवानगी न घेता आपत्ती व्यवस्थापन तसेच करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकनेता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोविंद घुगे (Govind Ghuge) यांनी सेंट लॉरेन्स शाळेसमोर श्री संत शक्ती धाम स्वामी समर्थ उद्यान येथे पोलिसांची परवानगी न घेता इंदूरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पाचशे ते सहाशे नागरिकांची गर्दी जमवली होती. याप्रकरणी पोलीस शिपाई अरुण घुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) हद्दीतील भाजपाच्या वतीने (BJP) सुदर्शन लॉन्स येथे दीपावली स्नेह मिलनाचा कार्यक्रम पोलिसांची कुठलीही परवानगी न घेता आयोजित करण्यात आला होता.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक सतीश सोनवणे, शाम बडोदे, भगवान दोंदे, सूनील देसाई, चंद्रकांत खोडे, साहेबराव आव्हाड, सुमन भालेराव, अर्चना थोरात, पुष्पा आव्हाड, शाईन मिर्झा, सचिन कुलकर्णी, रूपाली निकुळे, वसंत आव्हाड यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com