हॉस्पिटलची बनावट नोंदणी महागात; डॉक्टरवर गुन्हा

हॉस्पिटलची बनावट नोंदणी महागात; डॉक्टरवर गुन्हा

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

हॉस्पिटलचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र (Fake hospital registration certificate) बनवून त्याचा उपयोग मेडिक्लेम (Mediclaim) मंजूर करून घेण्यासाठी केल्याप्रकरणी राणेनगर (Ranenagar) येथील एका डॉक्टर (Doctor) विरोधात अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला....

याबाबत डॉ. बापूसाहेब भागवत नागरगोजे (Dr. Bapusaheb Bhagwat Nagargoje) (४२, रा. प्लॉट नंबर २०, शिवांजली लेन नं.४, कलानगर, दिंडोरी रोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राणेनगर येथील सुमन हॉस्पिटलचे डॉ. भरत शिवदास कांबळे (Dr. Bharat Shivdas Kamble) याने १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ दरम्यान हॉस्पिटलचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र (Fake hospital registration certificate) तयार करत होता. त्याचा वापर इन्शुरन्स कंपनीकडून मेडिक्लेम मंजूर करून घेण्याकरिता कांबळे याने केला.

म्हणून सुमन हॉस्पिटलचे डॉ. भरत शिवदास कांबळे याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी निलेश राजपूत करत आहेत.

Related Stories

No stories found.