जनावरांसाठी लसीकरण मोहीम राबवा : भुसे

जनावरांसाठी लसीकरण मोहीम राबवा :  भुसे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशपातळीसह अनेक राज्यात गोवंश जनावरांमध्ये लम्पी स्किन आजार (Lumpy skin disease)मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. या संक्रामक व सांसर्गिक आजारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय स्थळ भेटीद्वारे जनावरांसाठी लम्पी आजार लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे (Ports and Mines Minister Dada Bhuse) यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रादेशिक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.बी.आर नरवाडे, पशुसंवर्धन आयुक्तालयाचे सहआयुक्त डॉ.सुनील गिरमे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विष्णू गर्जे आदी उपस्थित होते.

ना.भुसे म्हणाले की, जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील पांगरी व दुसंगवाडी, देसवंडी व गुळवंच या गावातील जनावरांमध्ये लम्पी आजाराचा संसर्ग दिसून आला आहे. संसर्ग केंद्रापासून 5 कि.मी. बाधित क्षेत्र म्हणून प्रतिबंधित करण्यात आले आहे. राज्यात शासनाकडून प्रत्येक जिल्हयाच्या जिल्हाधिकार्‍यांना एक कोटी रूपयांचा निधी लम्पी आजार लस खरेदी व यासंदभार्तील प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनासाठी वितरित करण्यात आला आहे.

तालुकानिहाय प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकारी यांनी स्वत: स्थळभेट करून जनावरांची तपासणी करून लसीकरण करावे. यासोबतच लम्पी आजाराबाबत घ्यावयाची काळजी व निगारणी याबाबत शेतकजयांना मार्गदर्शन करावे. गावागावात गोचिड, डास निर्मूलन व स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचनाही ना.भुसे यांनी यावेळी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com