लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी मांढरे

लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करा :  जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात लसीकरणाचे Vaccination उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टीने मिशन ‘कवच कुंडल’ मोहीम Kavach Kundal Campign जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व यंत्रणांनी गावपातळीवर लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी सभागृह येथे आयोजित कोविड-19 लसीकरण जिल्हा कृतिदल समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी भूसंपादन गणेश मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शैलेश निकम, नाशिक महानगरपालिकेच्या माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.अजिता साळुंखे, महानगरपालिका मालेगाव माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.अलका भावसार, जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नांदापूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी मांढरे म्हणाले की, मिशन कवच कुंडल मोहिमेसाठी वेळेची मर्यादा लक्षात घेता अजून तीन दिवस हातात आहेत. आज येवला, सिन्नर व निफाड या तालुक्यांत रूग्णसंख्या वाढलेली आहे. या तिन्ही तालुक्यात व त्यांच्या सीमेवरील 14 गांवामध्ये लसीकरणाचे कॅम्पस आयोजित केल्यास निश्चितच त्यास चांगला प्रतिसाद मिळेल. मालेगाव शहरात लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी लसीकरणाबाबत स्थानिक प्रशासनाने व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे .

नवरात्र उत्सव जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. सप्तशृंगगड वणी, चांदवड, इगतपुरी व ज्या ठिकाणी देवींची शक्तीपीठे आहे, अशा ठिकाणी लसीकरण झालेल्या व्यक्तींना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. परंतु इतर ठिकाणाहून आलेले लोक त्याठिकाणी केवळ दर्शनासाठी गर्दी करत आहेत. या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे व त्यासाठी पोलीस यंत्रणेचीही मदत घ्यावी, असेही मांढरे यांनी यावेळी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.